Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रात्र झाली तरी पालघरच्या पत्रकारांचा ठिय्या सुरूच! जिल्हा प्रशासनाच्या असहकाराविरोधात आंदोलन!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
palghar journalists agitation agains zp for coverage problems

मुक्तपीठ टीम / पालघर

पालघर जिल्हा पत्रकार संघामार्फत आज पालघर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पालघर जिल्हा मुख्यालयाच्या आवारात हे धरणे आंदोलन रात्र झाली असतानाही सुरूच आहे. जिल्हा परिषदेच्या विविध कार्यक्रमांचे निमंत्रण मिळावे, जिल्हा परिषदेच्या विशेष सभेला पत्रकारांना बसण्याची मुभा मिळावी तसेच पालघर जिल्हा मुख्यालयाच्या निर्मितीवेळी या भव्य इमारतीत पत्रकारांसाठी एक पत्रकार कक्ष देण्यात यावा या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे
palghar journalists agitation agains zp for coverage problems

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधून आश्वासन दिलं. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये नियोजित स्थळी पत्रकार कक्ष स्थापन करावा या मागणीवर पत्रकार ठाम असून जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ या मागणीसाठी वेगळी पळवाट काढण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेऊन पत्रकारांना न्याय दिला जाईल असं आश्वासन फोन वरून दिलं आहे. तरीही जोपर्यंत जिल्हाधिकारी लेखी स्वरूपात निर्णय देत नाहीत, तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा पालघर जिल्हा पत्रकार संघाने घेतला आहे. आता रात्र झाली तरीही आंदोलन सुरूच ठेवलं आहे.

palghar journalists agitation agains zp for coverage problems

या पूर्वी जिल्हा मुख्यालय उदघाटनाच्यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या मागण्यांविषयी पत्रकारांना जाहीर आश्वासनही दिलं होतं, मात्र जिल्हा प्रशासनाकडून हे आश्वासन पूर्ण केले जात नाही. त्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी हे धरणे आंदोलन केलं आहे . यावेळी संघटनेमार्फत जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणावर पत्रकार उपस्थित आहेत. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसेच कोकण विकास पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जगदिश धोडी, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे निलेश सांबरे तेथे भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडे पत्रकारांच्या समस्या लक्षात घेत तातडीची चर्चा करावी अशी मागणी केली.


Previous Post

राज्यात ११९ नवे रुग्ण, १३८ रुग्ण बरे! मुंबई ३८, नाशिक १, नागपूर २ नवे रुग्ण !!

Next Post

एमिटी विद्यापीठात ‘टेक्निशिया २०२२’! कार रेसिंग, ड्रोन रेसिंगसह २८ स्पर्धा रंगल्या!!

Next Post
Amity

एमिटी विद्यापीठात ‘टेक्निशिया २०२२’! कार रेसिंग, ड्रोन रेसिंगसह २८ स्पर्धा रंगल्या!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!