मुक्तपीठ टीम
युक्रेनविरुद्ध रशियन युद्ध हे आणखी चिघळणार असल्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे जगभर चिंतेचं वातावरण आहे. त्यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी न्यूक्लियर डेटरेंट फोर्सना सतर्क आणि सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अणूयुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे. पण खरंच तसा धोका आहे की पाश्चिमात्य नाटो देशांच्या विरोधी भाषणांमुळे संतापलेले रशियाच्या अध्यक्षांनी केवळ दबाव तंत्राचा भाग म्हणून तशा सूचना दिल्याच्या बातम्या बाहेर दिल्या आहेत, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी इस्त्रायलच्या पुढाकारानं रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा होत असून त्यात काही चांगला निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
युद्धाचा आज पाचवा दिवस!
- रशिया आणि युक्रेन यांच्यात पाचव्या दिवशीही युद्ध सुरू आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांना युक्रेनकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे.
- रशियन सैन्याला आतापर्यंत युक्रेन मधील कोणतेही मोठे शहर ताब्यात घेण्यात फारसे यश मिळालेले नाही.
- याउलट रशियाला त्याच्या पावलांमुळे युरोपीय देशांबरोबरच अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या निर्बंधांना सामोरे जावे लागत आहे.
पुतिन यांची नाटो देशांना धमकीमुळे अणूयुद्धाची भीती?
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी न्यूक्लियर डेटरेंट फोर्सना सतर्क आणि सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- त्यामुळे अणूयुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.
- अशा प्रकारे अणू हल्ल्याची धमकी दिल्याची ही पहिलीच घटना आहे.
- संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि लष्करी प्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्या भेटीनंतर पुतिन यांनी हा आदेश दिल्याचे वृत्त आहे.
- त्यात ते म्हणाले, “नाटो देशांचे वरिष्ठ अधिकारी आमच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे देत आहेत.
- पाश्चिमात्य देशही आपल्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवणाऱ्या कारवाया करत आहेत.
- त्यामुळे देशाच्या न्यूक्लियर डेटरेंट फोर्सला हायअलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.
- रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या अणुशक्तीला हाय-अलर्टवर ठेवण्याचा थेट अर्थ असा की युक्रेनच्या रक्षणासाठी पाश्चात्य देशांनी उचललेले कोणतेही पाऊल रशियावर हल्ला म्हणून पाहिले जाईल आणि अणुयुद्ध होण्याची शक्यता आहे.
अमेरिका म्हणते…पुतीन यांची धमकी म्हणजे नाटक!
- न्यूक्लियर डेटरेंट फोर्स सज्ज ठेवण्याच्या पुतीन यांच्या धमकीचा अमेरिकेसह सर्व पाश्चात्य देशांनी निषेध केला आहे.
- जिथे अमेरिकेने पुतीन यांच्या या धमक्यांना नाटक असल्याचे म्हटले असून रशियाच्या अध्यक्षांनी अनेकदा केले आहे.
- संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी व्लादिमीर पुतिन यांनी अणुशक्तीचा इशारा दिल्याबद्दल एका वृत्त कार्यक्रमात विधान केले. “अध्यक्ष पुतिन ज्या प्रकारे हे युद्ध वाढवत आहेत ते पूर्णपणे अस्वीकाहार्य आहे,”. “सर्वांनी त्यांच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे,”
अणूयुद्धाची धमकी हे फक्त दबावतंत्र?
- अण्वस्त्र आता ठराविक राष्ट्रांची मक्तेदारी नाही.
- त्यातही रशियासारखीच अमेरिकाही अण्वस्त्रांच्याबाबतीत तुल्यबळ आहे.
- अमेरिकेकडे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र रोखण्याची यंत्रणाही आहे.
- त्यामुळे दोन तुल्यबळ महासत्ता अणू हल्ल्याची चूक करतील असं वाटत नाही.
- पुतीन यांनी केवळ विरोधात केली जाणारी आर्थिक कोंडी, प्रचार यामुळे अणूयुद्धाच्या धमकीचं दबावतंत्र म्हणून वापर केला असण्याची शक्यता आहे.