Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशिया-युक्रेन युद्ध: अणुयुद्धाचा खरंच धोका की फक्त दबाव तंत्र?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
putin And biden

मुक्तपीठ टीम

युक्रेनविरुद्ध रशियन युद्ध हे आणखी चिघळणार असल्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे जगभर चिंतेचं वातावरण आहे. त्यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी न्यूक्लियर डेटरेंट फोर्सना सतर्क आणि सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अणूयुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे. पण खरंच तसा धोका आहे की पाश्चिमात्य नाटो देशांच्या विरोधी भाषणांमुळे संतापलेले रशियाच्या अध्यक्षांनी केवळ दबाव तंत्राचा भाग म्हणून तशा सूचना दिल्याच्या बातम्या बाहेर दिल्या आहेत, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी इस्त्रायलच्या पुढाकारानं रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा होत असून त्यात काही चांगला निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

 

युद्धाचा आज पाचवा दिवस!

  • रशिया आणि युक्रेन यांच्यात पाचव्या दिवशीही युद्ध सुरू आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांना युक्रेनकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे.
  • रशियन सैन्याला आतापर्यंत युक्रेन मधील कोणतेही मोठे शहर ताब्यात घेण्यात फारसे यश मिळालेले नाही.
  • याउलट रशियाला त्याच्या पावलांमुळे युरोपीय देशांबरोबरच अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या निर्बंधांना सामोरे जावे लागत आहे.

पुतिन यांची नाटो देशांना धमकीमुळे अणूयुद्धाची भीती?

  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी न्यूक्लियर डेटरेंट फोर्सना सतर्क आणि सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  • त्यामुळे अणूयुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.
  • अशा प्रकारे अणू हल्ल्याची धमकी दिल्याची ही पहिलीच घटना आहे.
  • संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि लष्करी प्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्या भेटीनंतर पुतिन यांनी हा आदेश दिल्याचे वृत्त आहे.
  • त्यात ते म्हणाले, “नाटो देशांचे वरिष्ठ अधिकारी आमच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे देत आहेत.
  • पाश्चिमात्य देशही आपल्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवणाऱ्या कारवाया करत आहेत.
  • त्यामुळे देशाच्या न्यूक्लियर डेटरेंट फोर्सला हायअलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.
  • रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या अणुशक्तीला हाय-अलर्टवर ठेवण्याचा थेट अर्थ असा की युक्रेनच्या रक्षणासाठी पाश्चात्य देशांनी उचललेले कोणतेही पाऊल रशियावर हल्ला म्हणून पाहिले जाईल आणि अणुयुद्ध होण्याची शक्यता आहे.

 

अमेरिका म्हणते…पुतीन यांची धमकी म्हणजे नाटक!

  • न्यूक्लियर डेटरेंट फोर्स सज्ज ठेवण्याच्या पुतीन यांच्या धमकीचा अमेरिकेसह सर्व पाश्चात्य देशांनी निषेध केला आहे.
  • जिथे अमेरिकेने पुतीन यांच्या या धमक्यांना नाटक असल्याचे म्हटले असून रशियाच्या अध्यक्षांनी अनेकदा केले आहे.
  • संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी व्लादिमीर पुतिन यांनी अणुशक्तीचा इशारा दिल्याबद्दल एका वृत्त कार्यक्रमात विधान केले. “अध्यक्ष पुतिन ज्या प्रकारे हे युद्ध वाढवत आहेत ते पूर्णपणे अस्वीकाहार्य आहे,”. “सर्वांनी त्यांच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे,”

 

अणूयुद्धाची धमकी हे फक्त दबावतंत्र?

  • अण्वस्त्र आता ठराविक राष्ट्रांची मक्तेदारी नाही.
  • त्यातही रशियासारखीच अमेरिकाही अण्वस्त्रांच्याबाबतीत तुल्यबळ आहे.
  • अमेरिकेकडे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र रोखण्याची यंत्रणाही आहे.
  • त्यामुळे दोन तुल्यबळ महासत्ता अणू हल्ल्याची चूक करतील असं वाटत नाही.
  • पुतीन यांनी केवळ विरोधात केली जाणारी आर्थिक कोंडी, प्रचार यामुळे अणूयुद्धाच्या धमकीचं दबावतंत्र म्हणून वापर केला असण्याची शक्यता आहे.

Tags: AmericaNATORussiaUkraineअणूयुद्धनाटोन्यूक्लियर डेटरेंट फोर्सयुक्रेनरशियाव्लादीमीर पुतीन
Previous Post

#मुक्तपीठ LIVE संभाजीराजे छत्रपती यांचा महाराष्ट्राशी संवाद @YuvrajSambhaji @TulsidasBhoite

Next Post

रशिया X युक्रेन युद्ध: समजून घ्या संघर्षाचा इतिहास, नाटो आणि रशियाचा विरोध…

Next Post
Nato And War

रशिया X युक्रेन युद्ध: समजून घ्या संघर्षाचा इतिहास, नाटो आणि रशियाचा विरोध...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!