Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशिया X युक्रेन युद्ध: समजून घ्या संघर्षाचा इतिहास, नाटो आणि रशियाचा विरोध…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nato And War

मुक्तपीठ टीम

युद्धाच्या पाचव्या दिवशीही रशिया आणि युक्रेनचा युद्धाचा वणवा हा पेटलाच आहे. मात्र एकेकाळी सोव्हिएत युनियनच्या काळात मित्र असलेले हे प्रांत दोन देश झाल्यानंतर एकमेकांचे शत्रू का झाले आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

रशिया – युक्रेन संघर्षाचा इतिहास

  • सध्याचा रशिया हा युरोपपासून आशियातही पसरलेला आहे.
  • मात्र पूर्वी सोव्हिएट रशिया म्हणून अस्तित्वात असलेल्या देशाचा विस्तार त्यापेक्षाही मोठा होता.
  • १९९१ पर्यंत युक्रेनही सोव्हिएत युनियनचा भाग होता.
  • त्यानंतर काही प्रांत सोव्हिएट रशियातून फुटून निघाले.त्यातील एक युक्रेन.
  • तेव्हापासून क्रिमिया या भागावरून दोन देशांमध्ये संघर्ष सुरुच आहे.
  • युक्रेनच्या पश्चिमेला युरोप आणि पूर्वेला रशियाची सीमा आहे.
  • नोव्हेंबर २०१३ मध्ये युक्रेनचे तत्कालीन अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांनी कीवमध्ये विरोध करण्यास सुरुवात केली तेव्हा रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव सुरू झाला.
  • अमेरिकेच्या चिथावणीने व्हिक्टर यांच्याविरोधात आंदोलन पेटले. अमेरिका – ब्रिटनचा व्हिक्टर यांना विरोध होता, तर त्यांना रशियाचा पाठिंबा होता.
  • व्हिक्टर यानुकोविच यांना फेब्रुवारी २०१४ मध्ये अमेरिका-ब्रिटेन समर्थित आंदोलकांच्या विरोधामुळे देश सोडून पळून जावे लागले.
  • त्यामुळे संतप्त होऊन रशियाने दक्षिण युक्रेनमधील क्रिमियावर कब्जा मिळविला.
  • यानंतर त्यांनी तेथील फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिला.
  • या फुटीरतावाद्यांनी पूर्व युक्रेनचा मोठा भाग ताब्यात घेतला.
  • २०१४ पासून, डोनबास प्रांतात रशियन समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनियन सैन्यांमध्ये लढाई सुरू आहे.

याआधीही तणाव निवळण्यासाठी झाले प्रयत्न!

  • याआधीही १९९१ मध्ये जेव्हा युक्रेन सोव्हिएत युनियनपासून वेगळा झाला होता, तेव्हा क्रिमियावरून दोन्ही देशांमध्ये अनेक संघर्ष झाले होते.
  • २०१४ नंतर रशिया आणि युक्रेनमध्ये सततचा तणाव आणि संघर्ष रोखण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाश्चात्य देशांनी पुढाकार घेतला.
  • फ्रान्स आणि जर्मनी यांनी २०१५ मध्ये बेलारूसची राजधानी मिन्स्क येथे शांतता आणि युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली.

रशियाला नाटोचे का वावडे?

  • मुळातच नाटोची निर्मिती शीतयुद्धाच्या काळात रशियाविरोधात झाली.
  • अमेरिकेने तत्कालीन सोव्हिएत युनियनशी सामना करण्यासाठी नाटो म्हणजेच ‘North Atlantic Treaty Organisation’ ची निर्मिती १९४९ मध्ये झाली.
  • अमेरिका आणि ब्रिटनसह जगातील ३० देश नाटोचे सदस्य आहेत. जर एखाद्या देशाने तिसऱ्या देशावर हल्ला केला तर नाटोचे सर्व सदस्य देश एकत्र येऊन त्याचा मुकाबला करतात.
  • नाटोने आपला विस्तार करू नये, अशी रशियाची इच्छा आहे.
  • अलीकडेच युक्रेनने नाटोशी जवळीक आणि मैत्री निर्माण करण्यास सुरुवात केली.
  • अमेरिकेमुळे युक्रेनचे नाटोशी चांगले संबंध आहेत.
  • युक्रेनची नाटोशी जवळीक रशियाला आवडली नाही.
  • या मागणीबाबत राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेन आणि पाश्चात्य देशांवर दबाव आणत होते.

Tags: NATOनाटोयुक्रेनरशियारशिया X युक्रेन युद्धसोव्हिएत युनियन
Previous Post

रशिया-युक्रेन युद्ध: अणुयुद्धाचा खरंच धोका की फक्त दबाव तंत्र?

Next Post

भारतीय वंशाचे अनेक शास्त्रज्ञ परदेशातून भारतात परतण्यास उत्सुक! केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती!

Next Post
Indian origin Scientists abroad keen to return home

भारतीय वंशाचे अनेक शास्त्रज्ञ परदेशातून भारतात परतण्यास उत्सुक! केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!