मुक्तपीठ टीम
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह या पदासाठी एसी/ रेफ मेकॅनिक, कॉम्प्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कम्पोजिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मशीनिस्ट, मिल राइट मेकॅनिक, पेंटर, पाइप फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, यूटिलिटी हॅंड (स्किल्ड), ज्युनियर क्यूसी इंस्पेक्टर (मेकॅनिकल), ज्युनियर क्यूसी इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स), ज्युनियर क्यूसी इंस्पेक्टर (एनडीटी), ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल), प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स), स्टोअर कीपर, सेल मेकर, यूटिलिटी हॅंड (सेमी-स्किल्ड), अग्निशामक, सेफ्टी इंस्पेक्टर, सुरक्षा शिपाई, लाँच डेक क्रू, लाँच इंजिन क्रू/मास्टर २ क्लास, या पदांसाठी एकूण १ हजार ५०१ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, आणि अनुभव दिलेल्या पदांनुसार आणि नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://mazagondock.in/ वरून माहिती मिळवू शकता.