मुक्तपीठ टीम
भारतीय हवाई दलात ग्रुप ‘सी’ पदांवर सुपरिंटेंडेंट (स्टोअर) या पदासाठी १ जागा, निम्न श्रेणी लिपिक, या पदासाठी १२ जागा, कुक या पदासाठी ५ जागा, कारपेंटर या पदासाठी १ जागा, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर या पदासाठी ४५ जागा, फायरमन या पदासाठी १ जागा, मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी १८ जागा अशा एकूण ८३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- पदवीधर
- पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
- पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) केटरिंग डिप्लोमा/ प्रमाणपत्र ३) १ वर्ष अनुभव
- पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय (कारपेंटर)
- पद क्र.५- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड व हलके वाहनचालक परवाना ३) २ वर्षे अनुभव
- पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे
- पद क्र.७- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी आयसीटीच्या अधिकृत वेबसाइट https://indianairforce.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.