Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाला सर्वोतोपरी सहकार्य करणार

उरुळी कांचन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष खा. अमोल कोल्हे यांचे आश्वासन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
amol kolhe

मुक्तपीठ टीम 

माझ्या मतदार संघात देशभरातून दोन ते अडीच हजार पत्रकार येणार आहेत, येणाऱ्या पत्रकारांचे स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळत आहे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असून अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सुप्रसिद्ध अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांनी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.

marathi patrakar parishad

 

मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथे होणाऱ्या ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची परिषदेची विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी मान्य केली.. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे हे उरळी कांचन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असतील.. अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार असून उरूळी कांचन शिरूर मतदार संघातच येते.. अमोल कोल्हे यांनी राजा शिवछत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी अशा मालिकांमधून काम केलेले असून अमोल कोल्हे हे नाव महाराष्ट्रात सर्व परिचित झालेले आहे..

 

 

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या एका शिष्टमंडळाने आज पुण्यात खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली.. या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनील जगताप, सोशल मिडिया परिषदेचे पुणे जिल्हा प्रमुख जनार्दन दांडगे, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब काळभोर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पुणे जिल्हा निमंत्रक के. डी . गव्हाणे आदिंचा समावेश होता.. परिषदेच्या ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती एस.एम.देशमुख यांनी खा. अमोल कोल्हे यांना केली.. तसे लेखी पत्र त्यांना देण्यात आले.. अमोल कोल्हे यांनी ही विनंती मान्य केली..

 

 

१८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे परिषदेचे अधिवेशन होत असून त्याच्या पूर्व तयारीची बैठक आज कोंढवा येथे घेण्यात आली.. अधिवेशन ऐतिहासिक आणि हायटेक करण्याचा निर्धार यावेळी एस.एम.देशमुख यांनी बोलून दाखविला.. बैठकीस कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, समन्वयक सुनील जगताप, सोशल मिडिया परिषदेचे जनार्दन दांडगे, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब काळभोर यांच्यासह पन्नासवर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


Tags: अमोल कोल्हेउरुळी कांचनएस.एम.देशमुखमराठी पत्रकार परिषद
Previous Post

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘सी’ पदांच्या ८३ जागांसाठी भरती

Next Post

नवाब मलिकांचा सनसनाटी आरोप: “ड्रग्सच्या खेळामागे देवेंद्र फडणवीस आहेत का? ड्रग पेडलरशी घनिष्ठ संबंध!”

Next Post
malik vs fadanvis

नवाब मलिकांचा सनसनाटी आरोप: “ड्रग्सच्या खेळामागे देवेंद्र फडणवीस आहेत का? ड्रग पेडलरशी घनिष्ठ संबंध!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!