मुक्तपीठ टीम
कारखान्यांवरील आयकर कारवाईचे काही नाही, पण बहिणींवरील धाडींमुळे राजाकारण किती खाली घसरले ते दिसत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया गुरुवारी धाडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती. शुक्रवारी मात्र त्यांनी स्वत:ला सावरलेले दिसले. त्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे दिनक्रमाला सुरुवात केली. एका मत्स्यपालन प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संयमीपणे प्रतिक्रिया दिली, “पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल”.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारंशी संबंधित कारखान्यावर तसेच कुटुंबियाच्या घरी व पार्थ पवारांच्या मंबईतील कार्यालयावर आयकर विभागाने गुरुवारपासून धाडसत्र सुरु झाले. हे धाडसत्र दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गुरुवारपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर गुरुवारपासून धाड सुरु आहे. त्याआधी अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता.
काय म्हणाले अजित पवार
- अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत.
- आयकरच्या छापेमारीवर अजित पवार म्हणाले, “पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत.
- ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन.
- जे सत्य आहे ते उघड होईल.”
- मी सांगितलेलं आहे, सारखं सारखं मी सांगायची गरज नाही.
- एकदा ती प्रक्रिया पूर्ण होऊ द्या.
- ढगात गोळ्या मारू नका.
- जे असेल ते दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
पार्थ पवारांच्या कार्यालयावर धाड
- मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.
- काही महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाची टीम घेऊन गेल्याची माहिती मिळत आहे.
- महत्त्वाचं म्हणजे गेल्या २६ तासांपासून छापेमारी सुरु आहे.
- ७ तारखेला सकाळी ६ वाजल्यापासून सुरु असलेलं धाडसत्र आजही सुरु आहे.
- पार्थ पवार यांचे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सीईट्री नावाचे कार्यालय आहे.
- या इमारतीत ७ ते ८ जणांच्या टीमने छापेमारी केली. गुरुवारी १२ तास आयकर विभागाने चौकशी केली होती.
- अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता.
- यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत.
- त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.