Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पाहुणे घरातून गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन”!

गुरुवारी बहिणींवरील धाडींनंतर उद्विग्न झालेले अजित पवार आज शांत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ajit pawar

मुक्तपीठ टीम

कारखान्यांवरील आयकर कारवाईचे काही नाही, पण बहिणींवरील धाडींमुळे राजाकारण किती खाली घसरले ते दिसत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया गुरुवारी धाडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती. शुक्रवारी मात्र त्यांनी स्वत:ला सावरलेले दिसले. त्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे दिनक्रमाला सुरुवात केली. एका मत्स्यपालन प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संयमीपणे प्रतिक्रिया दिली, “पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल”.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारंशी संबंधित कारखान्यावर तसेच कुटुंबियाच्या घरी व पार्थ पवारांच्या मंबईतील कार्यालयावर आयकर विभागाने गुरुवारपासून धाडसत्र सुरु झाले. हे धाडसत्र दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

गुरुवारपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर गुरुवारपासून धाड सुरु आहे. त्याआधी अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता.

 

काय म्हणाले अजित पवार

  • अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत.
  • आयकरच्या छापेमारीवर अजित पवार म्हणाले, “पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत.
  • ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन.
  • जे सत्य आहे ते उघड होईल.”
  • मी सांगितलेलं आहे, सारखं सारखं मी सांगायची गरज नाही.
  • एकदा ती प्रक्रिया पूर्ण होऊ द्या.
  • ढगात गोळ्या मारू नका.
  • जे असेल ते दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

 

पार्थ पवारांच्या कार्यालयावर धाड

  • मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.
  • काही महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाची टीम घेऊन गेल्याची माहिती मिळत आहे.
  • महत्त्वाचं म्हणजे गेल्या २६ तासांपासून छापेमारी सुरु आहे.
  • ७ तारखेला सकाळी ६ वाजल्यापासून सुरु असलेलं धाडसत्र आजही सुरु आहे.
  • पार्थ पवार यांचे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सीईट्री नावाचे कार्यालय आहे.
  • या इमारतीत ७ ते ८ जणांच्या टीमने छापेमारी केली. गुरुवारी १२ तास आयकर विभागाने चौकशी केली होती.
  • अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता.
  • यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत.
  • त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.

 

किरीट सोमय्या बुधवारी आणि आयकर धाडी गुरुवारी!


Tags: Deputy Chief Minister Ajit Pawarincome taxNCPparth pawarआयकर विभागउपमुख्यमंत्री अजित पवार
Previous Post

२३ सप्टेंबरपासून सुरु आहे आयकर खात्याचं महाराष्ट्रातील महाऑपरेशन! एक हजार कोटींच्या नोंदी!!

Next Post

परदेशी प्रवाशांना १५ नोव्हेंबरपासून भारतात व्हिसा मिळणार!

Next Post
travel

परदेशी प्रवाशांना १५ नोव्हेंबरपासून भारतात व्हिसा मिळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!