मुक्तपीठ टीम
क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी तपास यंत्रणा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसंबंधित राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी गौप्यस्फोट केला. दरम्यान नवाब मलिक यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. यावेळी एनसीबीचं पुढचं टार्गेट कोण असणार याचा खुलासा केला आहे.
एनसीबीचं पुढचं टार्गेट कोण?
- भाजपा आणि एनसीबी हे दोघे मिळून बॉलिवूडला बदनाम करत आहेत.
- बॉलिवूडला बदनाम करण्याचं काम सुरु असून आता पुढचं टार्गेट शाहरुख खान आहे.
- शाहरुख खानला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे.
- शाहरुख खानला अडकवण्यात आलं.
- एनसीबी पब्लिसिटीसाठी लोकांना बोलावत आहेत.
- रिया चक्रवर्ती असेल, दीपिका पादुकोण असेल, ती भारती नावाची बाई असेल, अर्जुन रामपाल असेल, किती लोकांना बोलवून दिवसभर मीडियामध्ये बातमी चालवण्यात आली, शाहरुख खान हा पुढचा टार्गेट आहे.
- एक महिन्यापासून सांगण्यात येत होतं, पुन्हा त्याच्या मुलाला गोवण्यात आलं, अडकवण्यात आलं, हे सगळं फर्जीवाडा आहे.
पब्लिसिटीसाठी सेलिब्रिटींवर आरोप
- भाजपच्या आशिष शेलारांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे.
- मात्र मनिष भानुशाली सांगतो भाजपचा कार्यकर्ता.
- हा बऱ्याचशा मंत्र्यासोबत दिसत आहे.
- लोकांना मीडियाला बाईट देताना दिसताहेत. कायद्याचं राज्य नाही.
- मनिष भानुशाली भाजपचा कार्यकर्ता आहे.
- एक दोन ग्रॅमच्या केसेस करत आहेत.
- सेलिब्रिटींवर आरोप करुन पब्लिसिटीसाठी हे करत आहे.
- मविआ सरकार ताकदीन भाजपाला उत्तर देणार.
- भाजपकडून विरोधी सरकारांना त्रास देण्याचं काम सुरु आहे.
- पश्चिम बंगालसारखी परिस्थिती निर्माण केली जाते.
- महाराष्ट्रात मविआ सरकार ताकदीन भाजपाला उत्तर देऊ.