मुक्तपीठ टीम
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे येत्या ७ तारखेपासून सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने दिली. मात्र, मंदिरात प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला क्यूआर कोड प्री-बुकिंग करणं अनिवार्य असेल.
अशी करा नोंदणी
- श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
- “भाविकांना ७ ऑक्टोबरपासून सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश दिला जाईल.
मात्र, या प्रवेशासाठी भाविकांना श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अॅपवर क्यूआर कोड प्री-बुकिंग करणं अनिवार्य असेल. - त्याचसोबत, “दर तासाला फक्त २५० भाविकांनाच दर्शनासाठी क्यूआर कोड दिला जाईल”, असंही सांगण्यात आलं आहे.
- ६ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून दर्शनासाठी क्यूआर कोड नोंदणी करता येईल.
ही आहे नियमावली
- दर्शनासाठी येतांना कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे .
- १० वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील वृध्द तसेच गर्भवती महिलांनी शक्यतो दर्शनासाठी प्रवेश करणे टाळावे.
- मंदिरात प्रवेश करतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.
- योग्य अंतर ठेवा (६ फुट-६ फुट)
- मंदिर परिसरात ६-६ फुटावर स्टीकर बसविण्यात आले आहेत.
- मंदिरात प्रवेश केल्यानंतर गर्दी करणे टाळावे. दर्शनासाठी येतांना सामान, बॅग आणू नये.
- हार, फुले, नारळ, पूजेची सामग्री व प्रसाद घेऊन भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.