मुक्तपीठ टीम
संततीसाठी आसुसलेल्या स्त्रीयांना गर्भधारणेसाठी उपयुक्त ठरलेले आयव्हीएफ तंत्रज्ञान आता गायींसाठीही उपयोगी ठरत आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गावांमध्ये जेके ट्रस्टने त्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दयाराम ठेंगील या शेतकऱ्यांच्या सहा गाई लवकरच बछड्यांना जन्म देणार आहेत. या गायींना ‘इन-विट्रो फर्टिलायझेशन’ म्हणजेच आयव्हीएफ तंत्राचा वापर करून ‘समाधी’ नावाच्या गीर गायीच्या गर्भापासून गर्भधारणा झाली आहे. जेके ट्रस्टच्या दाव्यानुसार, 12 महिन्यांच्या अल्प कालावधीत 74 आयव्हीएफ गर्भधारणा करण्यात आल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत 100 आयव्हीएफ गर्भधारणेचे उद्दिष्ट आहे.
संपूर्ण प्रक्रियेचे नेतृत्व करणारे जेके बोवाजेनिक्स, जेके ट्रस्टचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.श्याम जव्हार यांनी सांगितले की, “फलटण तहसीलच्या तामखडा गावातील ठेंगील फार्ममधून होलस्टीन फ्रीजियन क्रॉसब्रेडमधून या गीर गाय ‘समाधी’ चे 10 आयव्हीएफ भ्रूण इतर गायींमध्येही ते गर्भधान करण्यात आले.
आयव्हीएफ तंत्रज्ञान गायींवर ठरले यशस्वी
- तंत्रज्ञान वापरलेल्या या 10 गायींपैकी 8 गायी गाभण असल्याची खात्री झाली आहे.
- या आयव्हीएफ प्रक्रियेत वापरलेले वीर्य प्रसिद्ध ब्राझिलियन गीर बैल ‘एस्पांटो’ चे होते.
- या 74 आयव्हीएफ गर्भाधानांपैकी 30 आयव्हीएफ बछडे यापूर्वीच महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यांसह देशाच्या विविध भागांमध्ये जन्माला आले आहेत.
- ही प्रक्रिया एक अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे ज्यासाठी अचूकता आवश्यक आहे. असे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.श्याम जव्हार म्हणाले.
हे मानवांमधील ‘टेस्ट-ट्यूब बेबी’ पद्धतीसारखेच आहे. आयव्हीएफची संपूर्ण प्रक्रिया ठेंगील यांच्या घरी केल्यामुळे ते खूप आनंदी आणि उत्साहित आहे. तामखडा गावाचे सरपंच ठेंगील म्हणाले की,“आयव्हीएफची संपूर्ण प्रक्रिया पाहून आम्हाला आनंद झाला आणि आता आठ गायींपैकी दोन गायींनी प्रत्येकी एक नर वासराला जन्म दिला आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसात इतर गायी वासरांनाही जन्म देईल.”
हेही वाचा-
गर्भधारणेचे विशेष तंत्रज्ञान ‘आयव्हीएफ’, नेमकं असतं तरी कसं?