मुक्तपीठ टीम
गोव्यातील आगामी विधानसभेसाठी सत्ताधारी भाजपा, आप मागोमाग तृणमूल काँग्रेसनेही चाचपणी सुरु केली आहे. शिवसेनेनेही जमले तेवढं बळ आजमावण्याची घोषणा केली आहे. आता काँग्रेसमध्येही हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेस नेते जॉर्ज कुरियन यांनी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना लढण्याची संधी देण्याची सूचना काँग्रेस नेते राहुल गांधींना केली आहे. त्यांचे ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
ट्विटरवर राहुल गांधींना सूचना
- काँग्रेस नेते जॉर्ज कुरियन यांनी राहुल गांधींना टॅग करत ट्विट केले आहे.
- ‘पुढील सरकार आपलेच स्थापन व्हावे, यासाठी आपण गंभीर असल्यास काँग्रेसला बहुसंख्य गोवेकरांच्या भावनांसह जावे लागेल,’
- त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप नसलेल्या सर्व नवीन विश्वसनीय चेहऱ्यांना तिकीट देणे आवश्यक आहे.
- राहुल गांधींना गोव्याविषयी योग्य माहिती देणे हे माझे कर्तव्य आहे.
कांग्रेस को बहुमत गोवावासियों की भावनाओं के साथ जाना होगा यदि अगली सरकार बनाने के बारे में गंभीर हैं,तो वे सभी नए विश्वसनीय चेहरों को बिना भ्रष्टाचार के आरोपों के टिकट दिए जाने की मांग करते हैं।
राहुल को गोवा के बारे में सही जानकारी देना मेरा कर्तव्य है। @RahulGandhiSave Tweet
— जॉर्ज कुरियन (@GeorgekurianINC) September 25, 2021
२०१७ चा गोवा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस उदयास आली, मात्र सरकार स्थापनेचा दावा करू शकली नाही . काँग्रेसकडे १७ आमदार होते, तर भाजपने १३ जागा जिंकल्या होत्या. नंतर काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सामील झाले.
तृणमूल निवडणूक लढवू शकते
- खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते या दिवस गोवा दौऱ्यावर आहेत. गोवा ,ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली असेल अशी अटकळ आहे.
आपचेही गोवकरांना आपलंसं करण्याचे प्रयत्न
- अलीकडेच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या.
- ते म्हणाले की जर चांगल्या हेतूने प्रामाणिक सरकार आले तर सर्व काही होऊ शकते.
- आणि जर गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले तर राज्यातील प्रत्येक घरातून एका बेरोजगार युवकाला नोकरी दिली जाईल.
शिवसेनेलाही पुन्हा आठवण!
- नेहमीप्रमाणे निवडणूक जवळ येताच शिवसेनेनेही दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे.
- शिवसेना नेते संजय राऊत यांनी तसे सुतोवाच केले आहे.
- एकतर युती करुन किंवा स्वबळावर शिवसेना गोव्याच्या लढाईत उतरण्याची शक्यता आहे.