Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“तारखांवर तारखा देण्याच्या संस्कृतीबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचे स्वागत”

उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल राम नाईक यांचे प्रतिपादन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
ram naik + sc

 मुक्तपीठ टीम

तारखांवर तारखा देण्याच्या ‘न्यायालयीन संस्कृती’ बद्दल सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी द्वारे व्यक्त केलेल्या विचारांबद्दलचे उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी स्वागत केले आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय श्री एम.आर. शहा आणि श्री ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने मध्य प्रदेशातील एका न्यायालयाने दहा वेळा तारखा दिल्यामुळे चार वर्षांची दिरंगाई झाल्याबद्दल 23 सप्टेंबर रोजी पुढील टिप्पणी केली.  “न्यायालयातील कार्य संस्कृती बदल करण्याची वेळ आली असून तारखांवर तारखा देण्याची संस्कृती बदलली पाहिजे.  तसे केले तरच न्यायालयात येणाऱ्या अशीलांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला तडा जाणार नाही आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकून राहील. …. वारंवार दिल्या जाणाऱ्या तारखांमुळे अशीलांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडून जातो.  न्यायालयांच्या कार्यामुळे सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील तसेच न्यायसंस्थेवरील विश्वास वाढविण्याची जबाबदारी न्यायालयांची आहे.”

 

सर्वोच्च न्यायालयाच्या या विचारांबद्दल मतप्रदर्शन करताना श्री राम नाईक म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयानेच या परिस्थितीवर उपाय शोधून त्याची परिणामकारक अंमलबजावणी देशातील सर्व न्यायालयात होईल हे पहिले पाहिजे.”

 

सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी एका न्यायालयाने दहा वेळा तारखा दिल्यामुळे चार वर्षांची न्यायदानात दिरंगाई झाल्याबद्दलची असली तरी श्री राम नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका रिट याचिकेबाबतचा स्वानुभव  सांगितला. श्री नाईक म्हणाले, “तारापूर अणु उर्जा प्रकल्पामुळे अक्करपट्टी आणि पोफरण या दोन गावातील 1,250 विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात 2004 साली रिट याचिका दाखल करण्यात आली.  गेल्या 17 वर्षात या प्रकरणी 38  ‘आदेश’ (ऑर्डर्स)  आणि 78  ‘तारखा’ दिल्याची नोंद न्यायालयाच्या संगणक प्रणालीतआहे. या प्रकरणी मी व्यक्तिशः हस्तक्षेप करून न्यायालयात तर्क देत आहे.  मी सहभागी होण्याचे कारण म्हणजे तारापूर प्रकल्प माझ्या लोकसभेच्या मतदार क्षेत्रात येत होता इतकेच नव्हे तर भारत सरकारचा मंत्री म्हणून तो प्रकल्प आरंभ करण्यापासून पूर्ण करेपर्यंत माझा सहभाग होता.  प्रकल्पातून 2004 पासून ऊर्जा निर्मितीही होत आहे.  परंतु 17 वर्षे झाली तरी रिट अर्जावर अद्यापि अंतिम निर्णय झालेला नाही.”

 

“उत्तर प्रदेशाचा राज्यपाल म्हणून माझी 5 वर्षांची मुदत 29 जुलै 2019 रोजी संपली.  सदर प्रकरणी मला पुन्हा हस्तक्षेपाची अनुमती द्यावी या माझ्या अर्जाची 5 मार्च 2020 रोजी पहिली सुनावणी झाली.  ‘करोना’ साथीमुळे त्या नंतर तारीखच मिळाली नाही.  अर्जाची सुनावणी लवकर करावी अशी विनंती मी आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाला करणार आहे”, असे श्री राम नाईक शेवटी म्हणाले.


Tags: muktpeethSupreme CourtUPउत्तर प्रदेशमाजी राज्यपाल राम नाईकसर्वोच्च न्यायालय
Previous Post

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना उमेदवारीची मागणी

Next Post

हेतल पगारेची IAS होण्याची कडवी जिद्द! दिवसाचे १८ तास अभ्यास!! यशानंतरही करणार पुन्हा प्रयत्न!

Next Post
हेतल पगारेची IAS होण्याची कडवी जिद्द! दिवसाचे १८ तास अभ्यास!! यशानंतरही करणार पुन्हा प्रयत्न!

हेतल पगारेची IAS होण्याची कडवी जिद्द! दिवसाचे १८ तास अभ्यास!! यशानंतरही करणार पुन्हा प्रयत्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!