मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तेथे जाण्यासाठी त्यांनी वापरलेल्या खास विमानाची सध्या चर्चा रंगली आहे. स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा देशाचे पंतप्रधान थेट अमेरिकेला गेला आहेत. अमेरिकेपर्यंतच्या दीर्घ प्रवासादरम्यान त्यांच्या विमानाना इतर कोणत्याही देशात उतरावं लागलं नाही. कुठेही न थांबता हा दीर्घ प्रवास करण्याचे श्रेय एअर इंडिया वन’ बी -777 या खास विमानाचे आहे. आजवर अमेरिकन अध्यक्ष त्यांच्यासाठी खास बनवलेल्या किल्ल्यासारख्या सुरक्षित फोर्स वन विमानाचा वापर करत, बांगलादेश दौऱ्यापासून भारतीय पंतप्रधानांच्या दिमतीलाही असं खास विमान आलं आहे.
भारतीय पंतप्रधान प्रथमच जर्मनीचा थांबा न घेता थेट अमेरिकेत!
- गेली अनेक वर्षे अमेरिकेला भेट देणारे भारतीय पंतप्रधान आतापर्यंत जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात मुक्काम करत असत.
- त्यानंतर ते तिथून पुन्हा अमेरिकेला जायचे.
- यावेळी तसे झाले नाही आणि पीएम मोदी न थांबता वॉशिंग्टनला पोहोचले.
- हा सुमारे पंधरा तासांचा नॉन-स्टॉप प्रवास पूर्ण करण्याचे श्रेय पंतप्रधान मोदींच्या अत्याधुनिक एअर इंडिया वन विमानाला जाते.
- पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमध्ये क्वाड शिखर संमेलन आणि संयुक्त राष्ट्र आमसभेला संबोधित करण्यासाठी गेले आहेत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या एअर फोर्स वनशी एअर इंडिया वनची तुलना…
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासासाठीचे खास एअर इंडिया वन विमान चर्चेत आहे.
- हे विमान त्याचा दिमाख, अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेमुळे लक्षवेधी ठरले आहे.
- या विमानाची तुलना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअर फोर्स वन या खास विमानाशी केली जात आहे.
- अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विमानाप्रमाणे, एअर इंडियाचे हे विमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
- हे विमान अत्यंत सुरक्षित आणि आरामदायक आहे.
- राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या प्रवासासाठी हे विमान अमेरिकेतून ऑक्टोबरमध्ये भारतात आले.
एअर इंडिया वनची वैशिष्ट्ये
- एअर फोर्स वन प्रमाणे हे भारतीय विमान देखील पूर्णपणे सुरक्षित आणि अभेद्य आहे.
- यामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
- शत्रूच्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास आणि प्रत्युत्तर देण्यास हे पूर्णपणे सक्षम आहे.
- या विमानात उड्डाण दरम्यान कोणत्याही आणीबाणीला सामोरे जाण्यासाठी सर्व व्यवस्था आहे.
- एअर इंडिया वनचे बी -777 विमान अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे.
- क्षेपणास्त्र हल्ल्यांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
- विमानाला सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज केले असल्यानं ते सर्वात मोठ्या हल्ल्यांना निष्प्रभावी आणि विफल करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
- कोणत्याही क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती देण्यासाठी विमानात सेन्सरही बसवण्यात आले आहेत.
- यात लार्ज एअरक्राफ्ट काउंटरमेझर्स (LAIRCM) आणि सेल्फ प्रोटेक्शन सूट (SPS) देखील आहेत.
- अमेरिकेने भारताला ही संरक्षण प्रणाली १९० दशलक्ष डॉलर्सच्या किंमतीत विकण्यास हिरवा झेंडा दाखवला होता.
- सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या विमानाने प्रवास करतात.
- या विमानावर एअर इंडिया वन चिन्ह कोरलेले आहे.