Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्लीत कडक सुरक्षेतील न्यायालयात गोळीबार, गँगस्टर गोगीसह तीन ठार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
दिल्लीत कडक सुरक्षेतील न्यायालयात गोळीबार, गँगस्टर गोगीसह तीन ठार!

मुक्तपीठ टीम

शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात फिल्मी स्टाइल गोळीबार झाला. भर दुपारी न्यायालय परिसरात हजर करण्यात आलेला गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याला गुंडांनी गोळ्या घालून ठार करण्यात आले. या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या उच्च सुरक्षा असलेल्या रोहिणी न्यायालयात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

 

या गोळीबारात गँगस्टर गोगी ठार झाला आहे. पोलिसांनीही बदमाशांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत दोघांना ठार केले. रोहिणी न्यायालयात दोन सशस्त्र बदमाश वकिलांच्या वेशात आले होते आणि यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. असे म्हटले जात आहे की ही लोकं गँगस्टर गोगीला मारण्यासाठी आले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गँगस्टर गोगीवर वकिलाचे कपडे घातलेल्या टिल्लू ताजपुरीया टोळीने हा हल्ला केला होता. जे दोन हल्लेखोर होते त्यामधील एकाचं नाव राहुल आहे, त्याच्यावर ५० हजार रूपयांचे बक्षिस घोषित केलेला आहे. या घटनेमुळे न्यायालयाची सुरक्षा, तपासाची प्रक्रियेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. न्यायालयाच्या आवारात अशा घटनेने एक भयानक वातावरण निर्माण केले आहे.

 

Multiple shots fired. Casualties in Rohini Court.
Gangwar inside court premises .
Mind it this in right in heart of Delhi #Rohini pic.twitter.com/BPVDlK5nXU

— Sagar maurya (@Sagarma63229573) September 24, 2021

 

शूटआऊट अॅट दिल्ली कोर्ट!

  • दिल्ली पोलीस रोहिणी न्यायालयात गँगस्टर जितेंद्र उर्फ ‘गोगी’ खटल्याच्या सुनावणीसाठी घेऊन आले होते.
  • या दरम्यान वकिलाच्या वेशात आलेल्या दोन गुंडांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, त्यात दोन्ही गुंड ठार झाले.
  • गोगीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला.
  • गोगीला २०२०मध्ये गुरुग्राम येथून अटक करण्यात आली होती.
  • त्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने अटक केली होती, तेव्हापासून तो तिहार तुरुंगात होता.
  • याच्यावर खून आणि दरोड्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
  • त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते, तिथून त्याला एका खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात आणण्यात आले होते.
  • टिल्लू ताजपुरीया टोळीच्या दोन गुंडांनी त्याच्यावर गोळीबार केला.

 

Delhi

 

 


Tags: delhi policeGogirohini courtगँगस्टर जितेंद्र उर्फ गोगीदिल्ली पोलीसरोहिणी न्यायालय
Previous Post

#सोयाबीन ट्विटरवर क्र.१वर ट्रेंड! सोयाबीन शेतकऱ्यांच्या विरोधातील केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात उठवला गेला आवाज!

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एअर इंडिया वन विमान! अमेरिकन अध्यक्षांच्या एअर फोर्स वनसारखंच!! समजून घ्या का आहे खास?

Next Post
narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एअर इंडिया वन विमान! अमेरिकन अध्यक्षांच्या एअर फोर्स वनसारखंच!! समजून घ्या का आहे खास?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!