Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एअर इंडिया वन विमान! अमेरिकन अध्यक्षांच्या एअर फोर्स वनसारखंच!! समजून घ्या का आहे खास?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narendra modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तेथे जाण्यासाठी त्यांनी वापरलेल्या खास विमानाची सध्या चर्चा रंगली आहे. स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा देशाचे पंतप्रधान थेट अमेरिकेला गेला आहेत. अमेरिकेपर्यंतच्या दीर्घ प्रवासादरम्यान त्यांच्या विमानाना इतर कोणत्याही देशात उतरावं लागलं नाही. कुठेही न थांबता हा दीर्घ प्रवास करण्याचे श्रेय एअर इंडिया वन’ बी -777 या खास विमानाचे आहे. आजवर अमेरिकन अध्यक्ष त्यांच्यासाठी खास बनवलेल्या किल्ल्यासारख्या सुरक्षित फोर्स वन विमानाचा वापर करत, बांगलादेश दौऱ्यापासून भारतीय पंतप्रधानांच्या दिमतीलाही असं खास विमान आलं आहे.

 

भारतीय पंतप्रधान प्रथमच जर्मनीचा थांबा न घेता थेट अमेरिकेत!

  • गेली अनेक वर्षे अमेरिकेला भेट देणारे भारतीय पंतप्रधान आतापर्यंत जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात मुक्काम करत असत.
  • त्यानंतर ते तिथून पुन्हा अमेरिकेला जायचे.
  • यावेळी तसे झाले नाही आणि पीएम मोदी न थांबता वॉशिंग्टनला पोहोचले.
  • हा सुमारे पंधरा तासांचा नॉन-स्टॉप प्रवास पूर्ण करण्याचे श्रेय पंतप्रधान मोदींच्या अत्याधुनिक एअर इंडिया वन विमानाला जाते.
  • पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमध्ये क्वाड शिखर संमेलन आणि संयुक्त राष्ट्र आमसभेला संबोधित करण्यासाठी गेले आहेत.

air india

 

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या एअर फोर्स वनशी एअर इंडिया वनची तुलना…

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासासाठीचे खास एअर इंडिया वन विमान चर्चेत आहे.
  • हे विमान त्याचा दिमाख, अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेमुळे लक्षवेधी ठरले आहे.
  • या विमानाची तुलना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअर फोर्स वन या खास विमानाशी केली जात आहे.
  • अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विमानाप्रमाणे, एअर इंडियाचे हे विमान अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
  • हे विमान अत्यंत सुरक्षित आणि आरामदायक आहे.
  • राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या प्रवासासाठी हे विमान अमेरिकेतून ऑक्टोबरमध्ये भारतात आले.

air india

 

एअर इंडिया वनची वैशिष्ट्ये

  • एअर फोर्स वन प्रमाणे हे भारतीय विमान देखील पूर्णपणे सुरक्षित आणि अभेद्य आहे.
  • यामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
  • शत्रूच्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास आणि प्रत्युत्तर देण्यास हे पूर्णपणे सक्षम आहे.
  • या विमानात उड्डाण दरम्यान कोणत्याही आणीबाणीला सामोरे जाण्यासाठी सर्व व्यवस्था आहे.
  • एअर इंडिया वनचे बी -777 विमान अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे.
  • क्षेपणास्त्र हल्ल्यांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
  • विमानाला सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज केले असल्यानं ते सर्वात मोठ्या हल्ल्यांना निष्प्रभावी आणि विफल करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
  • कोणत्याही क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती देण्यासाठी विमानात सेन्सरही बसवण्यात आले आहेत.
  • यात लार्ज एअरक्राफ्ट काउंटरमेझर्स (LAIRCM) आणि सेल्फ प्रोटेक्शन सूट (SPS) देखील आहेत.
  • अमेरिकेने भारताला ही संरक्षण प्रणाली १९० दशलक्ष डॉलर्सच्या किंमतीत विकण्यास हिरवा झेंडा दाखवला होता.
  • सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या विमानाने प्रवास करतात.
  • या विमानावर एअर इंडिया वन चिन्ह कोरलेले आहे.

Tags: Air indiaAmericajoe bidenprime minister narendra modiपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

दिल्लीत कडक सुरक्षेतील न्यायालयात गोळीबार, गँगस्टर गोगीसह तीन ठार!

Next Post

“केंद्रातील मोदी सरकारमुळेच सोयाबीनला मातीमोल किंमत!”: नाना पटोले

Next Post
nana patole

"केंद्रातील मोदी सरकारमुळेच सोयाबीनला मातीमोल किंमत!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!