मुक्तपीठ टीम
देशातील २ सर्वात मोठ्या बँकांनी बचत खात्यांवरील व्याजदर कमी केले आहेत. आता पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळेल. पंजाब नॅशनल बँकेतील नवीन व्याजदर १ सप्टेंबरपासून लागू होतील. तुमच्या खात्याबद्दल आणि त्याशी संबंधित व्याजदराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही पीएनबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता https://www.pnbindia.in/Interest-Rates-Deposit.html
पंजाब नॅशनल बँक पूर्वी बचत खात्यावर ३ टक्के दराने व्याज होते, ते आता २.९० टक्के करण्यात आले आहे. बँकेचे नवीन व्याजदर नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकांना लागू होतील. याचा अर्थ असा की जर तुमचे आधीच या बँकेत खाते असेल तर १ सप्टेंबरपासून तुमच्या बचत खात्यात जमा झालेल्या रकमेवर २.९० टक्के दराने व्याज मिळेल. दुसरीकडे, तुम्ही नवीन खाते उघडले तरी तुम्हाला जमा केलेल्या पैशांवर त्याच दराने व्याज मिळेल.
एसबीआयचे सर्वात कमी व्याज दर
- देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बचत खात्यांवर व्याज देण्याच्या बाबतीत मागे आहे.
- एसबीआय ग्राहकांना आता बचत खात्यावर २.७० टक्के व्याज मिळेल.
- पंजाब नॅशनल बँकेबरोबरच स्टेट बँकेनेही बचत खात्यांवरील व्याजदर कमी केले आहेत.
- एसबीआय आणि पीएनबी देशातील दोन सर्वात मोठ्या बँका आहेत, परंतु बचत खात्यांवर व्याज देण्याच्या बाबतीत इतर बँकांच्या तुलनेत खूप मागे आहेत.
- आयडीबीआय, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा यापेक्षा जास्त व्याज देतात.
- कोटक महिंद्रा आणि इंडसइंड बँक बचत खात्यांवर वार्षिक ४ ते ६ टक्के व्याज देते.
- त्याच वेळी, आयडीएफसी फर्स्ट बँक बचत खात्यावर ६% दराने व्याज देते.
- आयडीबीआय बँकेत बचत खात्यावर वार्षिक व्याज दर ३ ते ३.४%आहे,
तर कॅनरा बँक देखील बचत बँक खात्यावर २.९० टक्के ते ३.२० टक्के व्याज देते. - बँक ऑफ बडोदा २.७५ टक्के ते ३.२० टक्के आणि पंजाब अँड सिंध बँक बचत खात्यावर ३.१० टक्के व्याज देते.