मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री झाल्यानंतर कोकणातील चिपळूण दौऱ्याच्यावेळी नारायण राणे यांनी विधान परिषदेतील विप नेते प्रवीण दरेकर यांना चारचौघात गप्प बसवलं होतं. त्यावेळी तिथं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही होते. आता नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर फडणवीसांनी जन आशीर्वाद यात्रा बंद पडणार नसल्याची घोषणा केली. तसेच यात्रेचे नेतृत्व प्रवीण दरेकर करतील अशी घोषणा केली आहे. भाजपाचे आक्रमक नेते आशिष शेलार आणि फडणवीसांचे सत्ताकाळातील विश्वासू रवींद्र चव्हाण हेही दरेकरांसोबत असणार आहेत.
फडणवीसांची आघाडी सरकारवर टीका, जन आशीर्वाद सुरुच राहण्याची घोषणा!
- शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्याचा फटका बसेल.”
- बेकायदेशीररीत्या नारायण राणेंना अटक केली तरी जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही.
- प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा सुरू राहील.
- युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही.
- आमची यात्रा थांबणार नाही. जी कारवाई झाली, ती अयोग्य आहे.
- “शार्जील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो.
- हिंदुंना खुनी म्हणतो, त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता आणि आज मात्र अख्ख पोलीस फोर्स नारायण राणेंवर कारवाईसाठी सज्ज झाली आहे.
- तेव्हा आघाडी सरकार त्याला संरक्षण देते.
- मनपा निवडणुका झाली तर त्यांचेच नुकसान आहे.