मुक्तपीठ टीम
यामाहाने कंपनीच्या ६६ वर्षांच्या प्रवासाचा आनंद कोरोना योद्ध्यांसोबत वाटण्यासाठी खास ऑफर आणली आहे. १जुलै १९५५मध्ये जपानमध्ये स्थापन झालेल्या यामाहाचा प्रवास मोटरसायकल प्रेमींसाठी रोमांचक असा आहे. यामाहा मोटर इंडियाने कोरोना योद्ध्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास ‘ग्रॅटिट्यूड बोनस’ची घोषणा केली आहे.
यामाहाच्या फॅसिनो १२५ एफआय आणि रे झेडआर १२५ एफआय या स्कुटर्सच्या खरेदीवर पाच हजाराची सूट दिली जाईल. ही सूट वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी,पोलीस आणि नगरसेवक यांना मिळणार आहे. मुळात ही ऑफर १ ते ७ जुलै पर्यंत होती, पण कंपनीने आत्ता या ऑफरची मुदत वाढवली आहे.
‘यामाहा’चा प्रवास…
- यामाहा मोटर ने भारता मध्ये सर्वात पहिले १९८५ मध्ये एक संयुक्त बिजनेस च्या द्वारे पाऊल ठेवले होते.
- ऑगस्ट २००१ ला ही जपानची यामाहा मोटर कंपनी लिमिटेड १००% पूर्ण हिस्सेदारी कंपनी बनली आहे.
- २००८ मध्ये मित्सुई एंड कंपनी लिमिटेडने इंडिया यामाहा मोटर प्राइवेट लिमिटेडमध्ये सहसंचालक बनण्यासाठी दावा केला.
- आयव्हायएमच्या कारखान्यामध्ये स्टेट ऑफ द आर्ट प्लांट सूरजपुर (उत्तर प्रदेश) आणि कांचीपुरम (तमिलनाडु) मध्ये आहे.
यामाहाची जबरदस्त मॉडेल रेंज-
व्हायझेडएफ- आर१५ व्हर्जन ३.०(१५५ सीसी) एबीएस सोबत, एमटी -१५ (१५५ सीसी) एबीएस सोबत ब्लू कोर टेक्निक ते लेस मॉडेल सारखे एफझेड २५ ( २४९ सीसी) एबीएस सोबत , एफझेड- एस- एफआय ( फ्युल- इंजेक्टेड,१४९सीसी) एबीएस सोबत, एफझेड-एफआय ( फ्युल- इंजेक्टेड,१४९सीसी)एबीएस सोबत, एफझेड -एक्स ( फ्युल- इंजेक्टेड,१४९सीसी) एबीएस सोबत आणि यूबीएस पासून लेस फसिनो १२५ एफआय, रे झेडआर १२५ एफआय स्ट्रीट रॅली १२५ एफआय सारखे स्कूटर मॉडेल यांचा समावेश आहे.