Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेफाली वर्माची दुहेरी कामगिरी, आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटर आणि दहावी पास!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
shafali verma

मुक्तपीठ टीम

वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारी भारतीय महिला संघातील फलंदाज शेफाली वर्मा दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. हरियाणा बोर्डाने घेतलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून यात शेफालीने ५२ टक्के मिळवले आहेत. इंग्लंडला गेलेल्या शेफालीला तिच्या वडिलांनी फोनवर निकाल कळवला. त्यानंतर शेफालीने आनंद व्यक्त केला. शेफालीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबीयांना आनंद झाला आहे. नुकतीच आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत समावेशासोबतच दहावी पासची ही दुसरी कामगिरी म्हणजे शेफालीचा डबल धमाकाच आहे.

 

shafali verma (5)

 

हरियाणाच्या रोहतकमध्ये राहणारी १७ वर्षीय शेफाली वर्मा. शेफाली सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आतापर्यंत या दौऱ्यात भारताने एक कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली आहे. शेफालीने या दौऱ्यात कसोटी आणि वन डेत पदार्पण केले असून तिची कामगिरी देखील चांगली झाली आहे. भारताकडून पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यावेळी शेफालीने स्वत:च्या नावावर केला. या महिन्यात आयसीसीकडून दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराच्या यादीत शेफालीचा समावेश करण्यात आला आहे.

 

shafali verma (4)

शेफालीचं शालेय शिक्षण मंडळाकडून अभिनंदन

  • शेफालीने मार्च महिन्यात १०वीची परीक्षा दिली होती.
  • शालेय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, प्रोफेसर डॉ. जगबीर सिंह यांनी शेफाली यांचे अभिनंदन केले आहे.
  • ते म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रथम क्रमांकाची शेफाली वर्मा ५२% गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा मंडळाला अभिमान आहे. मी शेफाली वर्मा यांना शुभेच्छा देतो.

 

shafali verma (3)

शेफालीच्या कुटुंबात आनंदोत्सव

  • शैक्षणिक यशानंतर स्वाभाविकच कुटुंबातही आनंदाचे वातावरण आहे.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर शेफालीचे वडील संजीव वर्मा यांनी स्वत: फोन करून इंग्लंडला गेलेल्या मुलीला माहिती दिली.
  • इंग्लंडमध्ये शेफालीच्या उत्तम कामगिरीमुळे तिला महिन्याचा सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून निवडले जाण्याची शक्यता असल्याचे संजीव वर्मा यांचे म्हणणे आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: ICCshafali vermaआयसीसीवन डेशेफाली वर्माहरियाणा बोर्ड
Previous Post

प्रयोगशील शेतकऱ्यांचा अभिनव प्रयोग…जुन्या मोटरसायकलपासून ट्रॉली गाडी!

Next Post

‘यामाहा’ची कोरोना योद्ध्यांसाठी स्कुटर्सवर पाच हजारांची कृतज्ञता कॅश बॅक

Next Post
gnm (3)

‘यामाहा’ची कोरोना योद्ध्यांसाठी स्कुटर्सवर पाच हजारांची कृतज्ञता कॅश बॅक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!