मुक्तपीठ टीम
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. या वर्षातलं पहिलं चक्रीवादळ म्हणजे तौक्ते चक्रीवादळ. जे मंगळवारपर्यंत गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. देशात कोरोनाचं संकट असताना चक्रीवादळ येऊन धडकलं आहे. या चक्रीवादळाला तौक्ते हे नाव म्यानमार या देशातील हवामान तज्ज्ञांनी दिले आहे. त्याचा नेमका अर्थ काय, ते समजून घेऊया.
म्यानमारने केलं बारसं, शब्दाचा अर्थ जाणून घ्या
- म्यानमारने यावर्षाच्या पहिल्या चक्रीवादळाला तौक्ते हे नाव दिलं आहे.
- हा बर्मी भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ मोठ्याने आवाज करणारा सरडा असा आहे.
- सर्वसाधारणपणे प्रत्येक चक्रीवादळाच्या नावामागे एक विशेष प्रक्रिया असते.
- चक्रीवादळांचं नामकरण जागतिक हवामान विभागाच्या अंतर्गत येणारे जगभरातील वॉर्निंग सेंटर करत असतात.
- या संघटनेत १३ देश आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, मालदीव, बांगलादेश, म्यानमार, ओमान, श्रीलंका, थायलँड, इराण, कतार, सौदी अरेबिया, युएई आणि येमेन यांचा समावेश आहे.
- गेल्या वर्षी या देशांनी १३ नावं सुचवली होती.
- यामुळे चक्रीवादळांच्या १६९ नावांची यादी तयार झाली आहे.
#CycloneTauktae will hit Indian coasts soon. Do you know what it’s name means. ‘Tauktae’ (pronounced as Tau’Te), a name given by #Myanmar, means highly vocal lizard #GECKO.
The cyclone names are given by countries on rotation basis in region.@mcbbsr pic.twitter.com/AakbZva8gr
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) May 15, 2021
चक्रीवादळांना नावं का दिली जातात?
- चक्रीवादळ एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ घोंघावत असतो.
- एकाच वेळी दोन किंवा तीन वादळं येऊन धडकतात त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, आणि वादळ ओळखायला सोपं जावं यासाठी नावं दिली जातात.
- हवामान खात्यातील स्थानिक तज्ज्ञ वादळांची नावं ठरवतात.
- यामुळे धोक्याचा इशारा देणं आणि मागील चक्रीवादळांचा संदर्भ देणं सुलभ होतं.
- प्रादेशिक पातळीवरील नियमांनुसार सर्वसाधारणपणे उष्णकटीबंधीय चक्रीवादळांना नावे दिली जातात.