Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना सेंटरमध्ये गाडी घुसवून तोडफोड, मस्तवालाला अद्याप अटक नाही!

नाशिकमधील भाजपा नगरसेविकेच्या पतीला कोण वाचवतंय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nashik

मुक्तपीठ टीम

नाशिक मनपा रुग्णालयाच्या बिटको रुग्णालयात शनिवारी भाजपा नगसेवक सीमा ताजने यांचा पती राजेंद्र ताजने धुडगूस घातला होता. कोरोनासेंटरमध्ये गाडी घुसवून रुग्णांच्या आणि डॉक्टरांच्याही जीवाला धोका निर्माण करणाऱ्या मस्तवाल राजेंद्र ताजणेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याआधीही त्याने असे केल्याचे म्हटले जाते. तरीही या मस्तावालाला कोण वाचवत आहे, असा प्रश्न नाशिकमध्ये विचारला जात आहे.

शनिवारी नगरसेविका सीमा ताजने यांचे पती राजेंद्र ताजने नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात कार घुसवली. कोचेचा दरवाजा फुटल्याने रुग्णालयाच्या आत सर्वत्र काचा पसरल्या. रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडर आणि स्ट्रेचरची तोडफोड झाली आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांनी शिवीगाळही केली असून, नगरसेविकेच्या पतीनं रुग्णालयाचं नुकसान का केलं, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. संबंधित घटेनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे.

नाशिक मनपाचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोना केअर रुग्णालय आहे. सुमारे ९०० रुग्ण उपचार इथे घेत आहेत. राजेंद्र ताजणे यांनी केलेल्या या कृत्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ताजणे याने तेथील कर्मचाऱ्यांवर सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकनेही हल्ला केला. त्यामुळे तेही दहशतीत आहेत. राजकीय गुंडांवर कारवाई का नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

राजेंद्र ताजणेची कोरोना सेंटरमधील मस्तवाल गुंडगिरी

  • शनिवारी संध्याकाळी कोरोना उपचार केंद्रात ही घटना घडली.
  • या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे, त्यामुळे प्रकरण दाबणे अवघड झाले आहे.
  • रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील काचा फोडून इनोव्हा गाडी राजेंद्र ताजने यांनी रुग्णालयात घुसवली.
  • राजेंद्र ताजणेने वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर पेव्हर ब्लॉकनेही हल्ला चढवला, त्यामुळे त्याला गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने जे झाले ते अपघाती असा दावाही करता येणार नाही.
  • काही दिवसांपूर्वी राजेंद्र ताजने यांच्या वडिलांचं नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात निधन झालं होतं. पण त्याला २० दिवस उलटले आहेत, त्यामुळे तो राग म्हणता येत नाही.
  • स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांच्यामते राजेंद्र ताजणे यांना नगरसेविका असूनही रेमडेसिव्हिर वगैरेत प्राधान्य मिळत नाही, त्यामुळे लोकांना पुरवता येत नाही, असाही राग होता.
  • अद्याप त्याला अटक झालेली नसल्यामुळे या कृत्यामागील कारण स्पष्ट झालेलं नाही.

Tags: bjp corporatorcorona centrenashikनाशिक मनपा रुग्णालयबिटको रुग्णालयराजेंद्र ताजसीमा ताज
Previous Post

सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅजिलो विषाणू असतो तरी कसा?

Next Post

चक्रीवादळाच्या ‘तौक्ते’ या नावाचा नेमका अर्थ काय?

Next Post
cyclone (2)

चक्रीवादळाच्या ‘तौक्ते’ या नावाचा नेमका अर्थ काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!