मुक्तपीठ टीम
गेल्या आठवड्यात देशात दररोज सरासरी १ लाख २४ हजार ४७६ कोरोनाचे नवे रुग्ण नोंदवले जात आहेत. पहिल्या लाटेच्यावेळी हाच आकडा सर्वाधिक टोकावरही ९७ हजाराच्यावर गेला नव्हता. आता या दुसऱ्या लाटेत मात्र रोजच नवे सर्वाधिक रुग्णसंख्येचे आकडे समोर येत आहेत.
गेल्या रविवारी ५ एप्रिल रोजी प्रथमच चोवीस तासांत देशात एक लाखाहून अधिक प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यानंतरच्या रविवारी ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत १ लाख ५२ हजार नवे रुग्ण सापडले. या आठवड्यात सात दिवसांपैकी सहा दिवस दररोज एक लाखांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली, जी आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.
सध्या देशातील संसर्गाची एकूण प्रकरणं दुप्पट होण्याचा कालावधी ६०.२ दिवसांचा आहे आणि मृत्यूच्या दुप्पट होण्याचा कालावधी १३९.५ दिवस आहे.