Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘कोरोनामुक्त महाराष्ट्र’ करण्याचा काँग्रेसचा संकल्प!: नाना पटोले

April 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाने थैमान घातले असून राज्यातील सध्याची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत. ऑक्सीजन, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकार त्यांच्या पातळीवर काम करत आहे परंतु पक्ष म्हणून काँग्रेसने या कठीण काळात लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

 

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘राज्य कोरोना मदत व सहाय्य केंद्राचे’ व्हर्च्युअल उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बस्वराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, उपाध्यक्ष माणिकराव जगताप, धीरज देशमुख आदींनी व्हीसीद्वारे भाग घेऊन आपली मतं मांडली व सुचनाही केल्या.

 

नाना पटोले म्हणाले की, कोरोना महामारीने मोठे संकट उभे ठाकले आहे. लोकांना वैद्यकीय मदतीची नितांत गरज आहे, अशा कठीण प्रसंगी काँग्रेस नेहमीच लोकांच्या मदतीला धावून जात असते. देशासाठी काम करण्यात काँग्रेस नेहमीच अग्रभागी राहिला आहे. आजच्या कोरोना संकटातही लोकांना मदत करण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता तालुका, जिल्हा, वार्डा-वार्डातून दुःखीकष्टी जनतेच्या मदतीला धावून जाईल. जिल्हा काँग्रेसची सर्व कार्यालये २४ तास या मदत कार्यात उघडी राहतील. मुंबईतील टिळक भवन या पक्ष कार्यालयात मुख्य मदत केंद्र आहे. या मदत केंद्रावर येणाऱ्या फोनची नोंद घेऊन स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

 

राज्यात सध्या रक्तचा भयंकर तुटवडा आहे. रक्ताची गरज लक्षात घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून ‘रक्तदान सप्ताह’ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. राज्यभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेतली जातील. याकामात युवक काँग्रेस, एनएसयुआय, सर्व सेल व फ्रटंलचे सदस्य सहभाग घेतील. या माध्यमातून जमा करण्यात आलेले रक्त हे शासकीय रक्तपेढ्यांना दिले जाईल. मुंबईतून १० हजार रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प मुंबई काँग्रेसने केल्याचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले.

 


Tags: Congresscoronanana patolevaccinationभाई जगतापरक्तदान शिबिर
Previous Post

देशात कोरोनाची महालाट, पहिल्या लाटेतील सर्वाधिकपेक्षा रोजच जास्त रुग्ण

Next Post

महाराष्ट्रात ‘लॉकशाही’ – फडणवीस / लॉकडाऊन नाही तर मृतदेहांचा खच – वडेट्टीवार…ऐकायचं कुणाचं?

Next Post
Fadnavis Wadettiwar Corona politics

महाराष्ट्रात ‘लॉकशाही’ - फडणवीस / लॉकडाऊन नाही तर मृतदेहांचा खच - वडेट्टीवार...ऐकायचं कुणाचं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!