मुक्तपीठ टीम
आजच्या धावपळीच्या जीवनात हळूहळू असंसर्गजन्य आजारांची संख्या वाढली आहे. बदललेली जीवनशैली या सर्वातून आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या किडनी या अवयवावर परिणाम होत असून पूर्णपणे निकामी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज जागतिक किडनी दिन साजरा केला जातो. जागतिक किडनी दिनाचा उद्देश जगातील किडनीच्या आजाराचा वाढता प्रसार रोखणे आणि त्याचा प्रसार कमी करणे हे आहे.
आपण बऱ्याचदा आपल्या किडनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि किडनीसाठी आवश्यक पदार्थ आणि खाण्या-पिण्याकडे लक्ष देत नाही. बरेच लोक निरोगी किडनीसाठी काय उपाय करायचे असा प्रश्न करतात. या निमित्ताने किडनी निरोगी कशी ठेवावी यावर नजर टाकूया…
किडनी विकाराची कारणं
जेव्हा किडनीचे आजार सुरू होतो तेव्हा काही लक्षणे आढळतात. किडनीचे आजार छुपे असून अनेकदा ते शेवटच्या टप्प्यापर्यंत कळतच नाहीत. त्यामुळे किडनीचे आजार होण्याचे कारण म्हणजे ९० टक्के रुग्णांना आजाराचीच ओळखच होत नाही.
‘ही’ किडनी विकाराची ही मुख्य लक्षणं असू शकतात…
• युरिनचे रंग बदलणे किंवा त्यातून रक्त येणे हे एक किडनीच्या आजाराचे लक्षण आहे.
• या लक्षणामधूनच किडनीमध्ये स्टोन, ट्यूमर किंवा संसर्ग दर्शवते.
• याव्यतिरिक्त, रात्री वारंवार लघवीला जाणे हे देखील किडनीत काही तरी समस्या असल्याचे दर्शवते.
• याशिवाय, आपल्याला भूक मंदावणे, उलट्या होणे, थकवा जाणवणे, अंगावर सूज येणे, झोप न येणे यासारख्या समस्या असल्यास वेळेत डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
आपली किडनी निरोगी आहे की नाही हे कसे ओळखावे?
• किडनी निरोगी आहे की नाही हे तपासण्यासाठी काही चाचण्या केल्या जाऊ शकतात.
• जर रोगाची लक्षणे आढळली तर रक्त आणि युरिनची तपासणी करून घेतली जाते.
• या चाचण्यांद्वारे, रक्तातील प्रथिने आणि क्रिएटिनिनची पातळी तपासली जाते.
• दरम्यान, ज्या लोकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबच्या समस्या आहेत किंवा ज्यांच्या कुटूंबियात किडनी बाद झाल्याचे आढळले आहे त्यांनी या चाचण्या केल्याच पाहिजेत.
• जेणे करुन किडनी प्रत्यारोपणाची गरज भासेपर्यंत आजार जावू नये.