मुक्तपीठ टीम
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी विजय मिळवला आहे. द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. येत्या २५ जुलै रोजी त्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील आणि पदभार स्वीकारतील. मात्र भारतीय राज्यघटनेनुसार देशाचे प्रथम नागरिक मानले जाणाऱ्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतं हा प्रश्न अनेकांच्या मनात असेलचं, त्याचं प्रश्नावर आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
राष्ट्रपती कसे निवडले जातात?
- आतापर्यंत तुम्हाला निवडणूक प्रक्रियेची माहिती झाली असेल. संविधानातील कलम ५४ आणि ५५ हे राष्ट्रपती निवडीवर भाष्य करतात.
- त्यात राष्ट्रपती अप्रत्यक्षपणे निवडला जातो असे नमूद केले आहे. म्हणजेच, हे मतदान गुप्त पद्धतीने होते.
- लोकांनी ज्यांना निवडले ते लोकसभेचे खासदार, विधानसभेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतात आणि राष्ट्रपती निवडतात.
इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय?
- भारतात इलेक्टोरल कॉलेज प्रणालीद्वारे राष्ट्रपतींची निवड केली जाते.
- जे खासदार आणि आमदार मतदानासाठी पात्र आहेत त्यांना इलेक्टोरल कॉलेज म्हणतात.
- इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य प्रमाणानुसार प्रतिनिधित्व करतात.
- सदस्यांचे एकच मत हस्तांतरण आहे, परंतु सदस्यांची दुसरी निवड देखील लक्षात घेतली जाते.
सरन्यायाधीश देतात नव्या राष्ट्रपतींना शपथ
- राष्ट्रपतींच्या शपथविधीसंदर्भातील माहिती कलम ६० मध्ये मिळते.
- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराला पद आणि गोपनीयतेची शपथ देतात.
- जर सरन्यायाधीश अनुपस्थितीत असतील तर, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती शपथ घेऊ शकतात.
- राष्ट्रपतींचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
२५ जुलै रोजी शपथविधी का होतो?
- १९७७ मध्ये निलम संजीव रेड्डी बिनविरोध विजयी झाले होते, २५ जुलै १९७७ रोजी निलम संजीव रेड्डी यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
- यानंतर पुढील काळात २५ जुलै रोजीच नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधीचा सोहळा आयोजित केला जातो.
- तेव्हापासून ही परंपरा जपली आहे.
राष्ट्रपतींना किती पगार असतो?
- भारताच्या राष्ट्रपतींचे वेतन दरमहा ५ लाख रुपये आहे.
- याशिवाय राष्ट्रपतींना मोफत वैद्यकीय सुविधा, घर, वीज, टेलिफोन बिल आणि इतर भत्तेही मिळतात.
- राष्ट्रपतींना प्रवासासाठी खास डिझाइन केलेले मर्सिडीज बेंझ S600 पुलमन गार्ड वाहन मिळते.
- राष्ट्रपतींच्या ताफ्यात २५ वाहनांचा समावेश आहे.
- राष्ट्रपतींचे अध्यक्षीय अंगरक्षक असतात. त्यांची संख्या ८६ आहे.