Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करणार

November 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
maharashtra state election commission

मुक्तपीठ टीम 

राज्यभरातील ११३ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

 

मदान यांनी सांगितले की, एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या ८८, डिसेंबर २०२१ मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या १८ आणि ७ नवनिर्मित अशा एकूण ११३ नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १ नोव्हेंबर २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २६नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

 

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती मदान यांनी दिली.

 

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणाऱ्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: 

ठाणे- मुरबाड व शहापूर

पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा

रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित)

रत्नागिरी- मंडणगड, दापोली

सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे

पुणे- देहू (नवनिर्मित), माळेगांव (ब्रुद्रुक) (नवनिर्मित)

सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी

सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ

सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित)

नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी

धुळे- साक्री

नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ

अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी

जळगाव- बोदवड

औरंगाबाद- सोयगाव

जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित)

परभणी- पालम

बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी

लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ

उस्मानाबाद- वाशी, लोहारा

नांदेड- हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर, माहूर

हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ

अमरावती- भातकुली, तिवसा, धारणी, नांदगाव-खंडेश्वर

बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा

यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी

वाशीम- मानोरा, मालेगाव

नागपूर- हिंगणा, कुही, भिवापूर

वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर

भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर

गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी

चंद्रपूर- सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही

गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड. एकूण- ११३


Tags: Nagar Panchayat Electionvoter listनगरपंचायत निवडणूकमतदार यादीयू. पी. एस. मदानराज्य निवडणूक आयोग
Previous Post

कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा! कंगना, दरेकर, खोतांसाठी का काळादिवस?

Next Post

देशात सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला यश, पण काय होते तीन कृषी कायदे?

Next Post
farmers

देशात सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला यश, पण काय होते तीन कृषी कायदे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!