Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा! कंगना, दरेकर, खोतांसाठी का काळादिवस?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kangana khot darekar

मुक्तपीठ टीम

शुक्रवारी गुरु नानक जयंतीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीएक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचललं. त्यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या अचानक झालेल्या घोषणेने देशवासीयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आणि स्वागताच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. शेतकऱ्यांनी तर जिलेबी वाटत आनंद साजरा केला. पण काहींना मोदींचा निर्णय खूपच नाराज करणारा ठरला. भाजपा समर्थक अभिनेत्री कंगणा राणावतांना तो जिहादींचा विजय वाटला, तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यामते या निर्णयामुळे हा दिवस काळा दिवस ठरला आहे.

 

कंगणाला देश जिहादी राष्ट्राची भीती

  • पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना राणौत आजकाल तिच्या स्वातंत्र्याच्या वक्तव्यामुळे आणि महात्मा गांधींवर टीका केल्यामुळे चर्चेत आहे. आता कृषी कायद्याच्या पुनरागमनावर आपले मत व्यक्त करताना कंगनाने हे दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.
  • कंगना म्हणाली की, खरी शक्ती स्ट्रीट पॉवर आहे. ते सिद्ध झाले आहे. दुःखद, लज्जास्पद आणि योग्य नाही. निवडून आलेल्या संसदेऐवजी लोक रस्त्यावर कायदे करू लागले, तर हे जिहादी राष्ट्र बनेल.

 

दरेकर-खोतांसाठी काळा दिवस!

  • विरोधी पक्षनेते दरेकर म्हणतात, शरद जोशींचा आत्मा अस्वस्थ!
  • आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस आहे.
  • जेव्हा केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले तेव्हा मी म्हणालो होतो की, शरद जोशींच्या आतम्याला शांती लाभली असेल.
  • आज शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी कायदे मागे घ्यावे लागले आहेत.
  • मला वाटतं पुन्हा शरद जोशींचा आत्मा अस्वस्थ झाला असेल, असं त्यांनी सांगितलं.

 

शेतकरी नेते सदाभाऊ खोत म्हणाले

  • मोदींनी शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आंदोलनातील हवा निघून काढून घेतली आहे. विषय प्रतिष्ठेचा न करता मोदींनी शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणेच केलं आहे. त्यांनी स्वत:च्या मनासारखं केलं नाही.
  • हे कायदे देशातील ८० टक्के शेतकऱ्यांसाठी होता.
  • ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरापेक्षा कमी शेती आहे. त्यांच्या आर्थिक विकासासाठी हे कायदे आणले होते.

 

शेतकऱ्यांसाठी काळा दिवस!

  • शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस आहे.
  • शेतकऱ्यांना या कायद्याने स्वातंत्र्य मिळणार होते ते हिरावून घेतले, शेतकरी नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
  • मूठभर दलाल आडती हे आज जिंकले, पण दलालच्या तावडीतून सुटू इच्छिणारा शेतकरी मात्र हारला , त्याचा पराभव झाला आहे.
  • पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश शेतकरी मार्केट कमिटी भोवती बाजारपेठ फिरत असते, त्यांच्या टक्केवारी मिळते.
  • कोट्यवधी रुपयांचा यात भ्रष्टाचार होत आहे त्यांना आता संधी मिळाली.

Tags: farmersFarmlawsकंगणा राणावतकृषीकायदेजिहादपंतप्रधान नरेंद्र मोदीप्रविण दरेकरभाजपाशेतकरीसदाभाऊ खोत
Previous Post

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील १५ वर्षांची ब्लू प्रिंट तयार करावी

Next Post

राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करणार

Next Post
maharashtra state election commission

राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!