मुक्तपीठ टीम छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्या काळी झालेल्या लढाया, त्यांची कीर्ती, महती..ऑस्ट्रेलियामध्ये सुमधुर नवगीतांच्या माध्यमातून दुमदुमणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 'सईशा फाऊंडेशन मुंबई' निर्मित व प्रस्तुत 'संगीत शिवस्वराज्यगाथा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम 'सह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलिया'च्या सभासदांसाठी तसेच पर्थ, मेलबर्न, ब्रिस्बेन, सिडनी, अडलेड, कॅनबेरा व ऑस्ट्रेलिया टाईमझोनशी जवळपास असणाऱ्या देशांमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन स्ट्रीमिंगच्या माध्यमातून 'संगीत शिवस्वराज्यगाथा'च्या युट्युब पेजवर सादर करण्यात येणार आहे. तसेच युके, यूएसए, कॅनडा, न्यूझीलँड, सिंगापूर, मलेशिया, दुबई, अबूधाबी, नेदरलँड, जर्मनी आणि मॉरिशस येथील मराठी बांधवांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. शिवजन्म, स्वराज्याचे तोरण, वीर बाजीप्रभू देशपांडे, प्रतापगड युद्ध, महाराजांची आग्रा भेट, स्वराज्याचे आरमार, शिवराज्याभिषेक आणि अशी ...
Read more