Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रविवारी ऑस्ट्रेलियामध्ये दुमदुमणार ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’….ऑनलाईन स्ट्रीमिंगमधून पहिल्यांदाच भव्य सादरीकरण!

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजन, ४२ नवगीतांमधून साकारले शिवचरित्र

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Shivaswarajyagatha

मुक्तपीठ टीम

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्या काळी झालेल्या लढाया, त्यांची कीर्ती, महती..ऑस्ट्रेलियामध्ये सुमधुर नवगीतांच्या माध्यमातून दुमदुमणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘सईशा फाऊंडेशन मुंबई’ निर्मित व प्रस्तुत ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम ‘सह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलिया’च्या सभासदांसाठी तसेच पर्थ, मेलबर्न, ब्रिस्बेन, सिडनी, अडलेड, कॅनबेरा व ऑस्ट्रेलिया टाईमझोनशी जवळपास असणाऱ्या देशांमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’च्या युट्युब पेजवर सादर करण्यात येणार आहे. तसेच युके, यूएसए, कॅनडा, न्यूझीलँड, सिंगापूर, मलेशिया, दुबई, अबूधाबी, नेदरलँड, जर्मनी आणि मॉरिशस येथील मराठी बांधवांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

 

शिवजन्म, स्वराज्याचे तोरण, वीर बाजीप्रभू देशपांडे, प्रतापगड युद्ध, महाराजांची आग्रा भेट, स्वराज्याचे आरमार, शिवराज्याभिषेक आणि अशी अनेक स्फूर्तिदायी गीते सादर होणार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीनिमित्त स्थित आपल्या देशातील मराठी जनांनी एकत्र येऊन ‘सह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलिया’ संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून शिवजयंती उत्सवाबरोबरच मराठमोळी संस्कृती जपावी तसेच सगळे ज्ञान, वारसा पुढच्या पिढीला मिळावा हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

 

“गेल्या दोन वर्षाच्या परिस्थितीमुळे मोठ्या स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा करू शकलो नाही, पण म्हणून उत्साह कमी झालेला नाही. आपला देश, महाराष्ट्र आणि संस्कृती बद्दलचं प्रेम तसंच आहे आणि वाढत आहे. पार्कमध्ये येऊन आम्ही महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करतो. यंदा सादर होणारा संगीत शिवस्वराज्यगाथा कार्यक्रम प्रत्येकासाठी पर्वणीच ठरेल.” असे ‘सह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलिया’चे अध्यक्ष संतोष काशीद म्हणाले. ही संस्था आपल्या देशातील पूरग्रस्त, वृद्धाश्रम, रुग्णालये यांना मदतीचा हात देत सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.  ”आपल्या मायभूमीपासून दूर आपली माणसे आहेत तरीही इथली ओढ आणि आपल्या परंपरेचं जतन ही सर्व मंडळी करत आहेत. याचं कौतुक वाटतं” असा आनंद ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’चे लेखक अनिल नलावडे यांनी व्यक्त केला.

 

”शिवचरित्रातून राष्ट्रनिर्मिती हा या ऐतिहासिक संगीतमय कार्यक्रमाचा ध्यास आहे. आम्हाला आनंद आहे की ४२ नवगीतांमधून साकारलेले धगधगते शिवचरित्र ऑस्ट्रेलिया येथे पहिल्यादांच होत आहे.” असे कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका, निवेदिका पद्मश्री राव म्हणाल्या. गेल्या १२ वर्षांपासून ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’चा यशस्वी प्रवास सुरु आहे. महाराष्ट्रासह देशविदेशात ठिकठिकाणी याचे सादरीकरण होत आहे. लवकरच मुंबईत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून रसिकांना याचा प्रत्यक्ष आनंद घेता येईल.


Tags: australiaChhatrapati Shivaji Maharaj Jayanti Organizinggood newsmuktpeethMusic ShivaswarajyagathaNavgeetOnline StreamingSahyadri Sydney AustraliaSaisha Foundation MumbaiShivcharitraऑनलाईन स्ट्रीमिंगऑस्ट्रेलियाचांगली बातमीछत्रपती शिवाजी महाराज जयंतीनवगीतमुक्तपीठशिवचरित्रसईशा फाऊंडेशन मुंबईसंगीत शिवस्वराज्यगाथासह्याद्री सिडनी ऑस्ट्रेलिया
Previous Post

राज्यात १ हजार ६३५ नवे रुग्ण, ४ हजार ३९४ रुग्ण बरे!

Next Post

रेल्वेत ‘मिशन जीवन रक्षा’! रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जानेवारीत वाचवले ४२ प्राण!!

Next Post
rpf jawaan

रेल्वेत ‘मिशन जीवन रक्षा’! रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जानेवारीत वाचवले ४२ प्राण!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!