Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रगीताच्यावेळी डोळ्यात अश्रू…मोहम्मद सिराजने काय सांगितले?

सामना सोडून वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही नव्हता गेला

January 10, 2021
in मस्तच
0
Mohmmed Siraj Tears

मुक्तपीठ टीम

 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून सिडनी येथे खेळला जात आहे. सामन्यात राष्ट्रगीतादरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्याचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. अखेर त्याने सायंकाळी अश्रूंचे कारण स्पष्ट केले.

 

टॉस जिंकल्यानंतर मोहम्मद सिराजने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने अनुभवी ओपनर डेव्हिड वॉर्नरला ५ धावांनंतर पॅव्हेलियनवर पाठवले. त्याच मालिकेच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात सिराजने पदार्पण केले. पदार्पण कसोटीत त्याने ५ विकेट्स घेतल्या. सिडनी सामना सिराजच्या कारकीर्दीतील दुसरा सामना आहे.

 

सिराज वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाऊ शकला नव्हता

आयपीएलच्या 13 व्या सत्रात सिराज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता. तेथून ते थेट ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेले होते. याच काळात त्याचे वडील मोहम्मद गौस (वय 53) यांचे हैदराबादमध्ये निधन झाले.

ते बराच काळ फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज देत होते. ऑस्ट्रेलियातील क्वारंटाईन कालावधीमुळे सिराज वडिलांच्या अंत्यविधीला जाऊ शकला नाही. यानंतरही तो भारतात परतला नाही आणि तो संघात कायम राहिला.

आपल्या डोळ्यातील अश्रूंबद्दल नंतर सिराजने माहिती दिली. तो म्हणाला माझ्या वडिलांचे निधन झाले तरी मी जाऊ शकलो नव्हतो. मी भारतासाठी कसोटी खेळावी हे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले.

 

जाफरना आठवला धोणी

दरम्यान, माजी भारतीय ओपनर वासीम जाफर यांनी महेंद्रसिंग धोनीच्या आठवणींना उजाळा दिला. वसीम जाफर सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाले- मैदानावर चाहते कमी असले किंवा नसले तरी भारताकडून खेळणे यापेक्षा मोठी प्ररेणा असू शकत नाही.

महेंद्रसिंग धोनी म्हणाले होते की,”तुम्ही चाहत्यांसाठी नव्हे तर देशासाठी खेळता.”

२०११ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर धोनीने माध्यमांना हेच सांगितले. २०११ चे विजेतेपद भारतीय संघानेच जिंकले होते. त्याने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले होते.


Tags: India Australia Matchmohammed sirajTears in Siraj eyesऑस्ट्रेलियाभारत आणि ऑस्ट्रोलियाभारतीय राष्ट्रगीतमोहम्मद सिराजमोहम्मद सिराजच्या डोळ्यात अश्रूवासिम जाफर
Previous Post

“तिघांचे सरकार, चर्चा करुन मार्ग काढणार”

Next Post

रेल्वेच्या चीफ बुकींग सुपरवायझरची आत्महत्येने खळबळ

Next Post
railway chief booking supervisor suicide

रेल्वेच्या चीफ बुकींग सुपरवायझरची आत्महत्येने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!