मुक्तपीठ टीम शालेय विद्यार्थ्याना शिक्षण छान, मजेदार वाटण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांबरोबर उत्साहाने काम करत जगभरातील ७० हून अधिक ठिकाणी गोदरेज समूहाच्या ३,००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी समूहाच्या ८व्या जागतिक स्वयंसेवा सप्ताहात भाग घेतला. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर होणाऱ्या या वर्षीच्या उपक्रमाचा उद्देश हा खेळ आणि मजेदार प्रयोगांद्वारे मूलभूत संकल्पनांचे प्रात्यक्षिक करू मुलांमध्ये शिकण्याची आवड आणि विज्ञानाबद्दल कुतूहल जागृत करणे हा होता. उदाहरणार्थ, मुंबईत, गोदरेजने WOSCA च्या लाइफ- लॅब सायन्स प्रोग्रामबरोबर भागीदारी केली आहे. मुलांसाठी शाळांमध्ये अनुभवात्मक शिक्षण मंचांची स्वयं-शाश्वत संस्कृती निर्माण करण्यासाठी विज्ञान शिक्षकांना सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा ...
Read more