Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘वेदांता’ला ‘डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी वर्ल्ड इंडेक्स’मध्ये स्थान!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Vedanta

मुक्तपीठ टीम

वैविध्यपूर्ण नैसर्गिक संसाधनाची एक जागतिक कंपनी वेदांताला या वर्षी जगातील सर्वात विश्वासार्ह अशा पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ESG) निर्देशकांपैकी एक असलेल्या डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी(™) वर्ल्ड इंडेक्सच्या सूची मध्ये सामील गेले आहे. या वर्षी भारताकडून सूची मध्ये जोडली गेलेली एकमेव कंपनी असल्यामुळे वेदांता आता सूचीतील ३३२ जागतिक कंपन्यांमधील सहा भारतीय कंपन्यांपैकी एक झाली आहे. या समावेशासह वेदांता आता अँग्लो अमेरिकन पीएलसी आणि टेक रिसोर्सेस लिमिटेड सारख्या जागतिक कंपन्यांच्या सर्वोच्च यादीत सामील झाले आहे. कंपनी १११ जागतिक कंपन्यांच्या डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इमर्जिंग मार्केटस् इंडेक्स मध्ये देखील सूचीबद्ध आहे.

एस अँड पी जागतिक कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी  असेसमेंट २०२२ च्या , जे पूर्वी डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स( डीजेएसआय) म्हणून ओळखले जात असे, धातू आणि खाण क्षेत्रात वेदांता जागतिक स्तरावर २१६ कंपन्यांपैकी सहाव्या स्थानावर आहे (९८ पर्सेंटाइल) आणि एशिया पॅसिफिकमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. वेदांता सस्टेनेबिलिटी गुणांकामध्ये १४ गुणाच्या मजबूत सुधारणे सह गेल्या वर्षीच्या तुलनेत १० क्रमांकांनी वर गेले आहे.

या यशाबद्दल बोलताना वेदांता लिमिटेडच्या नॉन एक्सिकेटिव्ह संचालक सुश्री. प्रिया अग्रवाल हेब्बर म्हणाल्या, “डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी(™) वर्ल्ड इंडेक्स आणि डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इमर्जिंग मार्केटस् इंडेक्समध्ये समाविष्ट होणे हे वेदांतासाठी सन्मानाचे आहे. जागतिक निर्देशांकामध्ये समावेश आणि आमचे सुधारलेले व आणखी वर गेलेले गुणानुक्रम हे शाश्वत भविष्यासाठी आमच्या वचनबद्धतेची साक्ष आहे. डिकार्बनायझेशन, जल संवर्धन, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता, सामाजिक कल्याण आणि कर्मचाऱ्यांमधील विविधता यांवर लक्षपूर्वक कृती योजनांसह आम्ही पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ESG) क्षेत्रातील अग्रगण्य उद्योगांपैकी एक उद्योग बनण्यासाठी एक परिवर्तनात्मक प्रवास चालू करीत आहोत.”

पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय ( इ, एस आणि जी ) या तिन्ही परिमाणांमध्ये सुधारणा करून वेदांताच्या गुण संख्येने या वर्षी ६२ वरुण ७६ वर झेप घेतली आहे. पर्यावरण: ८३ ( गेल्या वर्षी पेक्षा १५ गुण अधिक), सामाजिक : ७४ ( गेल्या वर्षीपेक्षा १८ गुण अधिक) आणि प्रशासकीय: ७२ ( गेल्या वर्षीपेक्षा ११ गुण अधिक) हे विभागीय गुणांक आहेत.

डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स (डीजेएसआय) हा शाश्वततेमधील सर्वात महत्त्वाचा बेंचमार्क मानला जातो आणि तो ६१ उदयोग् क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांची एक सूची करतो. इ एस जी निर्देशांकांमध्ये दोन दशकांहून अधिक अनुभवासह डीजेएसआय सर्वात जूने, विश्वासार्ह आणि संदर्भित निर्देशांकांपैकी एक आहे.

डीजेएसआय ने सार्वजनिक आणि गैर-सार्वजनिक माहिती द्वारे पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन या निकषांवर १२० हून जास्त निर्देशांकावर २१६ जागतिक धातू आणि खाण कंपन्यांचे मूल्यांकन केले.  जागतिक निर्देशांकांमध्ये, दीर्घकालीन आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक निकषांवर आधारित; एस अँड पी ग्लोबल बी एम आय मधील सर्वात मोठ्या २५०० कंपन्यांच्या पहिल्या १०% चे  प्रतिनिधित्व करणाऱ्या जागतिक शाश्वतता अग्रणींचा समावेश आहे. सस्टेनेबल पद्धतींचा अवलंब करण्यात आणि पर्यावरण व समाजाचे रक्षण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात वेदांता अग्रेसर आहे. कंपनी इ एस जी मध्ये अग्रेसर होण्यासाठी सर्वसमावेशक फ्रेमवर्क तयार करीत आहे आणि तिचे प्रयत्न अशाप्रकारे जागतिक स्तरावर उत्तम गुणानुक्रम मिळण्यातून प्रतिबिंबित होते. साल २०५० पर्यंत नेट-झीरो संघटना होण्यासाठी वेदांता वचनबद्ध आहे आणि वेदांताने नेट-झीरो होण्यास गती देण्यासाठी पुढील दहा वर्षात पाच अब्ज डॉलर देण्याचे ठरविले आहे. समूहाने 1t.org या एक ट्रीलिअन ट्री  प्लॅटफॉर्म मध्ये सामील होऊन वर्ल्ड इकनॉमिक फोरम सोबत भागीदारी केली आहे आणि एक मजबूत, लवचिक व संवेदनक्षम वातावरण बनविण्यासाठी ७ मिलियन झाडी लाऊन त्यांना वाढविण्याचे वचन दिले आहे.


Tags: Dow Jones Sustainability World Indexgood newsmuktpeethVedantaVedanta LimitedVedanta-Foxconn Projectघडलं-बिघडलंचांगली बातमीडाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी वर्ल्ड इंडेक्समुक्तपीठवेदांतावेदांता लिमिटेडवेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प
Previous Post

मुलांसाठी विज्ञान मनोरंजक बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा ७० हून अधिक शाळांमध्ये ‘बलून कार प्रयोग’!

Next Post

पुण्यातील केजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत यांना ‘आऊटस्टँडिंग लीडर इन हायर एज्युकेशन’ पुरस्कार

Next Post
Dr.-Suhas-Khot

पुण्यातील केजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत यांना 'आऊटस्टँडिंग लीडर इन हायर एज्युकेशन' पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!