Tag: चांगली बातमी

स्विच मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक बसेसने आता जेएसडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक

मुक्तपीठ टीम स्विच मोबिलिटी लिमिटेड या अत्याधुनिक कार्बन न्युट्रल इलेक्ट्रिक बस आणि हलक्या व्यवसायिक वाहन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने जेएसडब्ल्यूशी भागिदारी केली असून त्याअंतर्गत भारतात कर्मचारी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. देशात कर्मचारी वाहतुकीसाठी मिळालेली ही इतकी मोठी पहिलीच ऑर्डर असून जेएसडब्ल्यू स्टीलच्या विजयनगर कारखान्यात ७१ बसेस वितरित केल्या जातील. या बसेसचे मालकी आणि सर्व कामकाज १२ वर्षांसाठी स्विच मोबिलिटीकडे राहाणार असून त्यात चार्जिंग पायाभूत सुविधा स्थापन करणे, देखभाल करणे यांचा समावेश असेल. इलेक्ट्रिक बसेसच्या पहिल्या ताफ्याला जेएसडब्ल्यू समूह कंपन्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल आणि स्विच मोबिलिटी लि. चे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी झेंडा दाखवला. स्विच मोबिलिटी लि. चे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘भारतातील खासगी बसेसची बाजारपेठ देशातील महत्त्वाच्या वाहतूक बाजारपेठांपैकी एक असून त्याचा हिस्सा ७० टक्के आहे. त्यापैकी खासगी इलेक्ट्रिक बस बाजारपेठ पुढील पाच वर्षांत ६० अब्ज रुपयांवर पोहोचेल असा अंदाज आहे. स्विच ईआयव्ही१२ला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर कर्मचारी वाहतूक क्षेत्रात प्रवेश करताना आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शाश्वत प्रवासात सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे. जेएसडब्ल्यूसह केलेली ही भागिदारी स्विच मोबिलिटीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण याअंतर्गत आम्ही देशातील आमची पहिली व सर्वात मोठी खासगी बसेसची ऑर्डर पूर्ण करत आहोत. आमच्या स्विच उत्पादनांमध्ये विश्वास दाखवल्याबद्दल मी जेएसडब्ल्यूच्या व्यवस्थापनाचे आभार मानतो. या शाश्वत प्रवासात सहभागी होण्याची उत्सुकता दाखवलेल्या देशातील इतर काही कॉर्पोरेट्सबरोबरही आमची बोलणी सुरू आहेत.’ एयर कंडिशन्ड बसेसमध्ये स्विच ईआयव्ही१२ चा समावेश असून ग्राहकस्नेही तंत्रज्ञान, आरामदायीपणा आणि अत्याधुनिक स्वरूप ही तिची वैशिष्ट्ये आहेत. स्विच ईआयव्ही१२मध्ये कनेक्टेड तंत्रज्ञान सुविधा स्विच ऑन देण्यात आले आहे जे रिमोट अनेबल करते, रियल टाइम डायग्नोस्टिक आणि देखरेख सुविधा तसेच जागतिक दर्जाच्या डिजिटल बॅटरी व्यवस्थापन साधन सुविधा देते. ईआयव्ही प्लॅटफॉर्मचे ईव्ही आर्किटेक्चर हे युरोपियन स्विच ई१ बसेसमध्ये पाहायला मिळते. बसेसमध्ये उच्च कार्यक्षमता असलेल्या मॉड्युलर बॅटरीजचा आधुनिक लिथियम- इयॉन केमिस्ट्रीसह समावेश करण्यात आला असून या बॅटरीज भारतीय हवामान लक्षात घेऊन खास तयार करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन्स आणि बॅटरीज अधिक चांगली कार्यक्षमता, दीर्घकाळ टिकाऊपणा आणि बाजारपेठेत मालकीहक्काचा कमी खर्च यांसह तयार करण्यात आल्या आहेत. या इलेक्ट्रिक बसेसचे कामकाज व सेवा सुरळीतपणे चालण्यासाठी स्विच आपल्या कर्मचारी वर्गाचा विस्तार करत असून पुढील पाच वर्षात मनुष्यबळ ३० टक्के वाढवण्याच्या धोरणाशी सुसंगत राहात कंपनीने २०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे ठरवले आहे.  

Read more

बांधणीला जागतिक ओळख! जामनगर ठरला GI टॅगचा मानकरी!!

मुक्तपीठ टीम बांधणीची कला ही अत्यंत कुशल प्रक्रिया आहे. बांधणीमध्ये वापरण्यात येणारा मुख्य रंग पिवळा, लाल, निळा, हिरवा आणि काळा ...

Read more

श्रुतींच्या आंदोलनाने अन रागाविष्काराने रंगले ‘ख्याल विमर्श’चे दुसरे सत्र

मुक्तपीठ टीम विविध श्रुती, त्यांची आंदोलने, श्रुती युक्त रागाविष्कार, श्रुती लावण्याचे वैविध्यपूर्ण प्रकार आणि त्यातून रंगलेली संध्याकाळ अशा स्वरमयी वातावरणात ...

Read more

विजय दिन: १६ डिसेंबरला पुण्यासह १५ शहरांमध्ये लष्कराकडून विजय दौड

मुक्तपीठ टीम पाकिस्तानवर १९७१च्या युद्धात मिळवलेला ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने १६ डिसेंबर २०२२ या विजय दिन ...

Read more

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात १२५ जागांसाठी करिअर संधी

मुक्तपीठ टीम नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग सुपरवाइजर, टेक्निकल ऑपरेशन्स-इलेक्ट्रिकल सुपरवाइजर, टेक्निकल ऑपरेशन्स-इलेक्ट्रॉनिक्स सुपरवाइजर, टेक्निकल ऑपरेशन्स-मेकॅनिकल सुपरवाइजर, टेक्निकल ...

Read more

ऊर्जा मंत्रालय करणार ४५०० मेगावॅटची एकूण वीज खरेदी, महाराष्ट्रानेही दाखवले स्वारस्य!

मुक्तपीठ टीम ऊर्जा मंत्रालयाने शक्ती धोरणाच्या अनुच्छेद B (v) अंतर्गत वित्तपुरवठा, मालकी  आणि परिचालन  (एफ ओ ओ) तत्वावर स्पर्धात्मक पद्धतीने ...

Read more

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार

मुक्तपीठ टीम यंदाच्या ४१व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून सहभागी झाले होते. या मेळाव्यात महाराष्ट्र दालनाला ‘भागीदार राज्य’ ...

Read more

‘गामा फाऊंडेशन फिल्म्स’ आणि ‘छाया प्रॉडक्शन’च्या लघुपटांचे स्पेशल स्क्रिनिंग

मुक्तपीठ टीम भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या "गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव" आणि  "एनएफडीसी फिल्म बाजार" २०२२ मध्ये पहिल्यांदाच लघुपट निर्मितीत ...

Read more

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. ...

Read more

पश्चिम-मध्य रेल्वेत २ हजार ५२१ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम पश्चिम-मध्य रेल्वेत २ हजार ५२१ अशा एकूण १२७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ एप्रिल ...

Read more
Page 11 of 139 1 10 11 12 139

ताज्या बातम्या

error: Content is protected !!