Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

श्रुतींच्या आंदोलनाने अन रागाविष्काराने रंगले ‘ख्याल विमर्श’चे दुसरे सत्र

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
pt. satyasheel deshpande performing

मुक्तपीठ टीम

विविध श्रुती, त्यांची आंदोलने, श्रुती युक्त रागाविष्कार, श्रुती लावण्याचे वैविध्यपूर्ण प्रकार आणि त्यातून रंगलेली संध्याकाळ अशा स्वरमयी वातावरणात ‘ख्याल विमर्श’चे दुसरे सत्र रंगले. तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढावी यासाठी कार्यरत ‘ऋत्विक फाउंडेशन’च्या वतीने ‘ख्याल विमर्श’च्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं. सत्यशील देशपांडे ख्याल गायकीचे अंतरंग उलगडले.
कोथरूडमधील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पं. देशपांडे यांनी हिंदुस्तानी संगीतातील श्रुती या खास घटकाचे रंगतदार सप्रयोग विश्लेषण केले. फाउंडेशनचे प्रवीण कडले, चेतना कडले, सुदिप्तो मर्जीत आदी, व प्रेक्षागृहात अनेक तरुण गायक व संगितोपासक उपस्थित होते.
pt. satyasheel deshpande
पंडितजींनी पहिल्या सत्रात, विविध ख्याल संगीतात नवनिर्मितीला व वैयक्तिक अभिव्यक्तीला कसा वाव मिळतो हे सप्रयोग दाखवलेच होते. हाच वाव श्रुतीच्या वैविध्यपूर्ण प्रयोगामुळे कसा वाढतो हा या दुसऱ्या सत्राचा विषय होता. हा अवघड विषय सांगण्यासाठी पंडितजींनी केलेल्या दरबारी कानडा, मिया मल्हार इत्यादी रागांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. सृजन देशपांडे यांनी सह गायन, तर अभिजीत बारटक्के यांनी तबल्यावर साथ संगत केली.
“श्रुती चे ठराविक गणिती कंप संख्येच्या स्तरावरचे आकलन प्राथमिक ठरते, व तिला चिकटलेली नादमयता व मानवी संवेदनांना महत्त्व देऊनच तिच्या श्रीमंतीची पूर्ण जाणीव होऊ शकते” असे मत पंडितजींनी व्यक्त केले.

 


Tags: good newsKhayal DiscussionKhayal Discussion Second SessionKothrudmuktpeethpt. satyasheel deshpandeRagavishkarRitwik Foundation for Performing ArtsShruti Andolanऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सकोथरूडख्याल विमर्शख्याल विमर्श दुसरे सत्रघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठरागाविष्कारश्रुती आंदोलन
Previous Post

विजय दिन: १६ डिसेंबरला पुण्यासह १५ शहरांमध्ये लष्कराकडून विजय दौड

Next Post

बांधणीला जागतिक ओळख! जामनगर ठरला GI टॅगचा मानकरी!!

Next Post
bandhani saree

बांधणीला जागतिक ओळख! जामनगर ठरला GI टॅगचा मानकरी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!