Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्विच मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक बसेसने आता जेएसडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Switch Mobility's electric buses

मुक्तपीठ टीम

स्विच मोबिलिटी लिमिटेड या अत्याधुनिक कार्बन न्युट्रल इलेक्ट्रिक बस आणि हलक्या व्यवसायिक वाहन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने जेएसडब्ल्यूशी भागिदारी केली असून त्याअंतर्गत भारतात कर्मचारी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. देशात कर्मचारी वाहतुकीसाठी मिळालेली ही इतकी मोठी पहिलीच ऑर्डर असून जेएसडब्ल्यू स्टीलच्या विजयनगर कारखान्यात ७१ बसेस वितरित केल्या जातील. या बसेसचे मालकी आणि सर्व कामकाज १२ वर्षांसाठी स्विच मोबिलिटीकडे राहाणार असून त्यात चार्जिंग पायाभूत सुविधा स्थापन करणे, देखभाल करणे यांचा समावेश असेल. इलेक्ट्रिक बसेसच्या पहिल्या ताफ्याला जेएसडब्ल्यू समूह कंपन्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल आणि स्विच मोबिलिटी लि. चे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी झेंडा दाखवला.

Switch Mobility's electric buses

स्विच मोबिलिटी लि. चे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘भारतातील खासगी बसेसची बाजारपेठ देशातील महत्त्वाच्या वाहतूक बाजारपेठांपैकी एक असून त्याचा हिस्सा ७० टक्के आहे. त्यापैकी खासगी इलेक्ट्रिक बस बाजारपेठ पुढील पाच वर्षांत ६० अब्ज रुपयांवर पोहोचेल असा अंदाज आहे. स्विच ईआयव्ही१२ला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर कर्मचारी वाहतूक क्षेत्रात प्रवेश करताना आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शाश्वत प्रवासात सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे. जेएसडब्ल्यूसह केलेली ही भागिदारी स्विच मोबिलिटीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण याअंतर्गत आम्ही देशातील आमची पहिली व सर्वात मोठी खासगी बसेसची ऑर्डर पूर्ण करत आहोत. आमच्या स्विच उत्पादनांमध्ये विश्वास दाखवल्याबद्दल मी जेएसडब्ल्यूच्या व्यवस्थापनाचे आभार मानतो. या शाश्वत प्रवासात सहभागी होण्याची उत्सुकता दाखवलेल्या देशातील इतर काही कॉर्पोरेट्सबरोबरही आमची बोलणी सुरू आहेत.’

एयर कंडिशन्ड बसेसमध्ये स्विच ईआयव्ही१२ चा समावेश असून ग्राहकस्नेही तंत्रज्ञान, आरामदायीपणा आणि अत्याधुनिक स्वरूप ही तिची वैशिष्ट्ये आहेत. स्विच ईआयव्ही१२मध्ये कनेक्टेड तंत्रज्ञान सुविधा स्विच ऑन देण्यात आले आहे जे रिमोट अनेबल करते, रियल टाइम डायग्नोस्टिक आणि देखरेख सुविधा तसेच जागतिक दर्जाच्या डिजिटल बॅटरी व्यवस्थापन साधन सुविधा देते. ईआयव्ही प्लॅटफॉर्मचे ईव्ही आर्किटेक्चर हे युरोपियन स्विच ई१ बसेसमध्ये पाहायला मिळते.

बसेसमध्ये उच्च कार्यक्षमता असलेल्या मॉड्युलर बॅटरीजचा आधुनिक लिथियम– इयॉन केमिस्ट्रीसह समावेश करण्यात आला असून या बॅटरीज भारतीय हवामान लक्षात घेऊन खास तयार करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन्स आणि बॅटरीज अधिक चांगली कार्यक्षमता, दीर्घकाळ टिकाऊपणा आणि बाजारपेठेत मालकीहक्काचा कमी खर्च यांसह तयार करण्यात आल्या आहेत.

या इलेक्ट्रिक बसेसचे कामकाज व सेवा सुरळीतपणे चालण्यासाठी स्विच आपल्या कर्मचारी वर्गाचा विस्तार करत असून पुढील पाच वर्षात मनुष्यबळ ३० टक्के वाढवण्याच्या धोरणाशी सुसंगत राहात कंपनीने २०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे ठरवले आहे.

 


Tags: Electric busesgood newsJSW EmployeesmuktpeethSWITCH MOBILITYइलेक्ट्रिक बसेसघडलं-बिघडलंचांगली बातमीजेएसडब्ल्यू कर्मचारीमुक्तपीठस्विच मोबिलिटी
Previous Post

बांधणीला जागतिक ओळख! जामनगर ठरला GI टॅगचा मानकरी!!

Next Post

व्हीएनआयटी नागपूरमध्ये विविध पदांवर १२४ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
vnit

व्हीएनआयटी नागपूरमध्ये विविध पदांवर १२४ जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!