मुक्तपीठ टीम
आजच्या काळात स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यामुळे दळणवळण आणखी सोपे झाले आहे. फोनमुळे सर्वकाही अगदी सोपे झाले आहे, पण त्याचबरोबर त्याचे धोकेही तितकेच वाढले आहेत. अनेक महत्त्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह केलेली असते. त्यात मोबाईल हॅकिंगचा धोका वाढत आहे. यामुळे महत्त्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो. अनेक वेळा युजर्सना त्यांचा फोन हॅक झाल्याचेही कळत नाही. हॅकर्स सर्व वैयक्तिक डेटा चोरू शकतात आणि त्याचा गैरवापर करू शकतात.
मोबाईल हॅक झाला आहे कळणार कसे?
- मोबाईलचा स्पीड अचानक कमी होतो किंवा सतत हँग होतो.
- फिशिंग अनेकदा ईमेलच्या स्वरूपात फसवणूक करण्याच्या प्रयत्नात करतात.
- फोन व्यवस्थित काम करत आहे आणि अचानक हँग होतो.
- अशावेळी स्मार्टफोनमध्ये मालवेअर असते.
- कधीकधी वेगळे अंक असलेल्या नंबरवरून कॉल आणि मेसेज येतात.
- त्या लिंकवर क्लिक करणे, हे मोबाइल हॅक करण्यासाठी पुरेसे आहे.
- असामान्य पॉप-अप जाहिराती येतात त्यावर क्लिक करू नका किंवा उघडू नका.
- डेटाचा वापर वाढला असेल, तर ते फोन हॅकरचे लक्षण असू शकते.
- मोबाईलवर नवीन अॅप्स इंस्टॉल होणे.
- योग्यरितीने काम करणारी अॅप्स अचानक काम करणे बंद होतात.
- ऑडिओ ऐकत असताना किंवा कॉल करताना पाठचा आवाज ऐकू येत असल्यास, ते तुमचा फोन हॅक झाल्याचे लक्षण असू शकते.
मोबाइल सेन्सर आणि बॅटरी
- सतत चार्ज करूनही फोनची बॅटरी संपते.
- मोबाईल स्क्रीन बंद केल्यानंतरही अॅप्स काम करतात.
- फोनचे सेन्सर पुन्हा पुन्हा शोधू लागतात.
- हे देखील मोबाईल हॅकिंगचे लक्षण आहे.
मोबाईल हॅक न होण्यासाठी हे नियम पाळा…
- वेगवेगळ्या साइट्सवर वेगवेगळे पासवर्ड वापरा
- मुख्य ईमेल पासवर्ड पुन्हा वापरणे टाळा.
- नेहमी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरा.
- ऑनलाइन शॉपिंग करत असल्यास, सुरक्षित साइटवरूनच शॉपिंग करा.
- पॉप-अप्सकडे दुर्लक्ष करा.
- सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळा.
- कार्डचे तपशील कोणत्याही वेबसाइटवर कधीही साठवू नका.