Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रणगाडाविरोधी गाईडेड क्षेपणास्त्र ‘हेलिना’ची यशस्वी उड्डाण चाचणी

April 12, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
DRDO

मुक्तपीठ टीम

हेलिना या रणगाडाविरोधी गाईडेड क्षेपणास्त्राची ११ एप्रिल २०२२ रोजी उंच पर्वतरांगांमध्ये स्वदेशी बनावटीच्या हेलीकॉप्टरवरून यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली. युजर प्रमाणीकरण चाचण्यांचा भाग म्हणून संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या शास्त्रज्ञांचे गट आणि भारतीय लष्कर व भारतीय हवाईदल यांनी संयुक्तपणे ही चाचणी घेतली. आधुनिक कमी वजनाचे हेलीकॉप्टर (ALH) वापरुन ही चाचणी करण्यात आली आणि कृत्रिम रणगाडा लक्ष्य निर्धारित करून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. क्षेपणास्त्र सोडण्याआधी इन्फ्रारेड इमेजिंग सिकर या तंत्राच्या वापराने क्षेपणास्त्राला दिशा निर्देश देण्यात येतात. हे जगातील सर्वात आघाडीच्या आधुनिक रणगाडाविरोधी शस्त्रापैकी एक आहे.

 

पोखरण येथे झालेल्या प्रमाणीकरण चाचण्याचा पुढील भाग म्हणून उंच पर्वतरांगांमध्ये घेतली गेलेली क्षमता चाचणी ही या क्षेपणास्त्राची आणि कमी वजनाचे हेलीकॉप्टर यांच्या संयुक्त एकात्मिक क्षमतेची चाचणी होती. लष्कराचे वरिष्ठ कमांडर्स व संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक या चाचणीला उपस्थित होते.

 

Flight test of indigenously developed helicopter launched Anti-Tank Guided Missile ‘HELINA’ carried out from Advanced Light Helicopter at high-altitude ranges along with participation of Indian Army and Indian Airforce.@PMOIndia @DefenceMinIndia @SpokespersonMoD @adgpi @IAF_MCC pic.twitter.com/s1LmVTeZgy

— DRDO (@DRDO_India) April 11, 2022

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त कामातून पहिले लक्ष्य साध्य केल्याबाबत संरक्षण आणि संशोधन विकास संस्था आणि भारतीय लष्कर या दोहोंचे अभिनंदन केले आहे. कठीण परिस्थितीत प्रशंसनीय कार्य पार पाडल्याबद्द्ल संरक्षण व संशोधन विकास विभागाचे सचिव व संरक्षण व संशोधन विकास संस्थेचे अध्यक्ष जी सतिश रेड्डी यांनी या कामात सहभागी असलेल्या चमूंचे अभिनंदन केले.

 

As part of ongoing user validation trials, Anti-Tank Guided Missile ‘HELINA’ successfully flight tested again today for a different range and altitude.@PMOIndia @DefenceMinIndia @SpokespersonMoD @adgpi @IAF_MCC pic.twitter.com/CxgpoV6R5p

— DRDO (@DRDO_India) April 12, 2022


Tags: DRDOHELINAभारतीय लष्करराजनाथ सिंहसंरक्षण आणि संशोधन विकास संस्थाहेलिना
Previous Post

वेस्टर्न कोलफिल्डमध्ये अर्ज केला आहे? आता लेखी परीक्षा, प्रवेशपत्र असं डाउनलोड करा…

Next Post

मुंबईत हेल्मेटच्या गुणवत्ता तपासणीसाठी शोध मोहीम, कंपनीत जप्तीही!

Next Post
BSI

मुंबईत हेल्मेटच्या गुणवत्ता तपासणीसाठी शोध मोहीम, कंपनीत जप्तीही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!