/ व्हा अभिव्यक्त!
साठ वर्षांपूर्वी म्हणजेच २ जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस दलास ध्वज प्रदान केला तेव्हापासून २ जानेवारी हा दिवस पोलिस स्थापना दिन म्हणून ओळखला जातो.
पोलीस ध्वज व ब्रीद वाक्य :
पोलिस ध्वजाचा रंग निळा असून सभोवती पांढऱ्या रंगाची रेशमी किनार ,मध्यभागी तारा पंचकोनी पारंपरिक चिन्ह ताऱ्याच्या मध्यभागी दोन वर्तुळे आणि वर्तुळात हाताचा पंजा जो अभय दर्शवितो, तार्याच्या खाली ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश अशा असा होतो आणि तो पोलिस दलाचा उद्देश काही अंशी खराही ठरवितो.
सद्रक्षणायचा सर्रास चुकीचा वापर!
पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो ध्वज दिला होता त्याने त्यावरील ब्रीद वाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय होते ,परंतु आजमितीस पोलीस दलाकडून व शासनाकडूनही अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या चुकीच्या शब्दाचा वापर होतो यासाठी मी २०१५ पासून शासन स्तरावर, पोलीस दलाशी, इतरांशी पाठपुरावा करतो. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश होतो तसे पहिले तर सद्र या संस्कृत शब्दाचा संबंध पोलीस दलाशी संबंधित नाही. तरीही आज अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जसे पोलीस ध्वज, पोलिसांची वाहने, कार्यालयीन रजिस्टर ,ऑफिस फलक ,पोलीस स्टेशनच्या दर्शनी भागावर लावण्यात येणारे फलक, व पोलीस लोगो…. या महत्त्वपूर्ण ठिकाणी दोन्ही ब्रीद वाक्य सोयीनुसार वापरली जातात.
पोलिस दलात होणारी ब्रीद वाक्यातील चकू माझ्या लक्षात २०१५ मध्ये आली परंतु शिस्तप्रिय पोलीस दालाकडून ईतकी मोठी चूक होणार नाही असे वाटत असल्याने मी वर्षभर त्यावर अभ्यास केला. त्यानंतर २०१६ मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक अहमदनगर सौरभ त्रिपाठी यांना मी निवेदन दिले, निवेदन दिले असता . त्यांनी चूक तर मान्य केली परंतु तुम्ही हे सर्व काही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करतात असे सुनावले.
यानिमित्ताने एक सांगायचे की पोलीस दल आणि पोलीसाशी मैत्री किंवा शत्रुत्व स्वीकारण्यास सामान्य नागरिक घाबरतात तसा मी घाबरलो होतो. परंतु चूक जर असेल तर ती मान्य करणे हे संबंधित विभागाचे काम आहे .परंतु झालेली चूक मान्य करण्यास मनाचा मोठेपणा आवश्यक असतो आणि तो मोठेपणा मला काही अधिकारी मध्ये दिसला नसल्याने मी याच्यावर काम करण्याचे ठरविले.
२०१६ रोजी अहमदनगर पोलीस अधीक्षकांना दिलेले माझे निवेदन कार्यालयाकडून दोनदा गहाळ झाले तरी तिसऱ्यांदा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले त्यानंतर त्याची तक्रार महाराष्ट्र शासनाच्या *आपले सरकार* या पोर्टलवर तेव्हा अजब उत्तर मिळाले की या कामासाठी तुम्ही लोक लोकांचा सहभाग वाढवा. मी या कामासाठी गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी ,यांना वेळोवेळी मेल केले किंवा निवेदने दिली परंतु दखल घेतली गेली नाही ,शेवटी पाठपुरावा करत असताना दिनांक ३ जानेवारी २०२० रोजी अहमदनगर अधीक्षक कार्यालयातून एक पत्र काढण्यात आले आणि त्या पत्रात सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद चुकीचे असल्याचे त्यांनी मान्य केले . या पत्रामुळे मी अधीक जोमाने काम करण्यास सुरुवात केली.
समाजात कायदा-सुव्यवस्था व शांतता राखण यातून समाजाला शांततेने व चांगले जिवन जगण्यास पोलीस दल पोलीस बांधव नेहमीच आपले कार्य चोखपणे पार पाडतात त्याचवेळी ते गुन्हेगार यांना कायद्याच्या कचाट्यात आणून कायद्याच्या मदतीने त्यांचा निग्रह म्हणजे अंतही करतात त्यांना गुन्ह्याची शिक्षा मिळवण्यासाठी नियमित प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांना सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य साजेशे वाटते. तसे पाहिले तर सद्र या शब्दाला तसा पोलीस दलाचे निगडित काहीही अर्थ नाही सद्र म्हणजे काय किंवा या शब्दाचा अर्थ आणि पोलीस दल यांचा कामाची असलेला संबंध यावर कोणीही अधिकारी काहीही सांगू शकत नाही.
पोलिस दलाच्या व्हाट्सअप व ट्विटर डीपीवर चुकीचे पोलीस ब्रीद असलेला लोगो वापरण्यात येतो याबाबत कल्पना दिल्यानंतर काही जण दखल घेतात व डीपी बदलतात परंतु अनेकांना ही चूक दुरुस्त करण्याची गरज वाटत नाही. डीपी तील चूक दुरुस्त करणाऱ्यांच्या यादीत माननीय जयंत पाटील साहेब यांचा प्रथम क्रमांक लागतो तसेच नाशिक पोलीस ,कोल्हापूर पोलीस, नागपूर पोलीस व ….. अनेकांनी दखल घेऊन डीपी बदलले परंतु अनिल देशमुख साहेब, आदिती तटकरे मॅडम, महाराष्ट्र पोलीस, अनेक पोलीस विभाग व ..,. यांनी चूक दुरुस्त करण्याची तसदी घेतली नाही.
जोपर्यंत शासन स्तरावर याविषयी योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत ब्रिद वाक्यातील विसंगती आपणास पाहावीच लागेल. पोलीस दलातील काही अधिकारी चांगल्या चे संरक्षण आणि आणि दुर्जनांचा अंत करतात पोलीस दला बाबत सामान्य नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. आजमितीस पोलीस दलाचे ब्रिद खलरक्षणाय आणि सदनिग्रहणाय असे हवे असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.
या ६० पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस ब्रीद वाक्य बाबत योग्य निर्णय होईल अशी माझी अपेक्षा होती परंतु अजूनही यावर काहीही निर्णय झालेला दिसत नाही इच्छुक असेल तर पोलिस दलाने मोठ्या मानाने ही चूक मान्य केली परंतु जोपर्यंत शासन स्तरावर योग्य निर्णय होत नाही पोलीस दलाकडून ,महाराष्ट्र शासनाकडून व इतर… अनेकांकडून सोयीनुसार २ ब्रीद वाक्याचा वापर केला जाईल. ही विसंगती टाळायची असेल तर शासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा. यासाठी मी कालही पाठपुरावा करत होतो आजही करील आणि जोपर्यंत यावर योग्य निर्णय होणार नाही तोपर्यंत मी पाठपुरावाच करत राहील याची शासनाने नोंद घ्यावी