Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत केळी ४० रुपये डझन! मग खानदेशातल्या शेतकऱ्यांकडून का व्यापारी घेतच नाहीत केळी?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
banana

मुक्तपीठ टीम

मुंबईत सध्या रस्त्यावर जरी केळी विकत घेतली तरी एका डझनला ४० रुपये मोजावे लागत आहे. मुंबईतील ग्राहकांना महाग दरानं केळी घ्यावी लागत असताना खानदेशातून आलेली बातमी ही मन विषण्ण करणारी आहे. खानदेशातल्या शेतकऱ्यांकडून व्यापारी केळी तोडणीला येत नसल्याने केळीचे घड झाडावरच पिकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी व्यापारी केळीला मागणी नसल्याचे सांगतात. पण प्रत्यक्षात ही व्यापाऱ्यांची नेहमीची क्लुप्ती असून ते भाव पाडण्यासाठी तसं करतात, असं शेतकरी सांगतात.

 

व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान…

  • नंदुरबार जिल्ह्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते.
  • मात्र गेल्या तीन महिन्यांपासून केळीला योग्य भाव मिळत नाही आहे.
  • जिल्ह्यात केळी तीन रुपये प्रति किलोने परवडत नसतानाही शेतकरी केळी व्यापाऱ्यांना देण्यास तयार आहेत.
  • मात्र व्यापारी केळी काढण्यास तयार नसल्याने केळीचे घड झाडावर पिकत आहे.
  • गेल्या चार पाच दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे केळी पिकण्याचे प्रमाण वाढले आहे.
  • पिकलेले केळीचे घड शेतकरी काढून फेकत आहेत.
  • त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

 

प्रशासनाने बैठक घेत मार्ग काढण्याची शेतकऱ्यांची मागणी

  • केळी लागवडीपासून एकरी ५० ते ६० हजार रुपयांचा खर्च झालेला आहे.
  • ऐन काढणीच्या वेळी व्यापारी मनमानी करत असतात.
  • त्यात व्यापारी येत नसल्याने केळीचे घड झाडावर पिकत असल्याने प्रशासनाने व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक घेत मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags: bananamumbainandurbarकेळीखानदेशमुंबई
Previous Post

सद की सद्र? ६० वर्षांनंतरही ब्रीदवाक्याबाबत पोलीस दलात संभ्रम का?

Next Post

लोकसभा-विधानसभेसाठी आता उमेदवार ‘अधिकृत’रीत्या जास्त खर्च करू शकणार!

Next Post
ec (2)

लोकसभा-विधानसभेसाठी आता उमेदवार 'अधिकृत'रीत्या जास्त खर्च करू शकणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!