Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२०२५ पर्यंत टीबी मुक्त भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न

क्षयरोगाच्या विरोधात जन-आंदोलन सुरू करण्यासंदर्भात डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

February 25, 2021
in सरकारी बातम्या
0
Dr. harshavardhan

मुक्तपीठ टीम

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी क्षयरोगाविरूद्ध जन-आंदोलन सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अन्य विकास भागीदारांसह उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीच्या सुरुवातीला, डॉ हर्षवर्धन यांनी टीबी रोगाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमा (एनटीईपी) अंतर्गत सकारात्मक कृती आणि संसाधने यांचे सहाय्य प्राप्त असलेल्या भारत सरकारने घेतलेल्या विविध उपाययोजनांची रूपरेषा सांगितली. “आम्ही २०२१ हे क्षयरोग निर्मुलन वर्ष बनवू इच्छितो” असे मंत्री म्हणाले, त्यांनी गेल्या काही वर्षांत सर्व रूग्णांना नि:शुल्क, उच्च गुणवत्तेची क्षयरोग चिकित्सा, पुरविण्या संदर्भातील कामांच्या प्रगतीची रूपरेषा सांगितली. यामुळे सेवेची अधिक मागणी वाढेल, रोगाचा निर्मुलन होईल आणि २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दीष्ट हे पंतप्रधानांचे स्वप्न साध्य करण्यात मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या आजारावर सर्वांगिण मात करण्यासाठी नवीन पद्धतींचे महत्त्व आणि क्षयरोगमुक्त भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी त्वरित व निरंतर लक्ष देण्याची गरज समजून घेत मंत्री म्हणाले, “क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात टीबी व्यवस्थापन आणि सेवा वितरण अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणे सुरू असतानाच, या रोगाबाबत जनतेमध्ये जनजागृती पसरवून लोकशाहीचा सार आणि जनआंदोलनाची भावना वापरली तरच उत्तम आरोग्य सेवा प्रदान करून या आजाराविरूद्धची चळवळ यशस्वी होईल.” क्षयरोग प्रतिसादाच्या विविध टप्प्यात समुदाय आणि समुदाय-आधारित गटांचा संपूर्ण सहभाग आणि सहकार्य सुनिश्चित करून जास्तीत जास्त लोकसंख्येपर्यंत यांचे महत्व अधोरेखित करणे हे त्याच्या अभिनव चळवळीचे पायाभूत स्तंभ आहेत.

 

भारताने साथीच्या रोगाचा केवळ यशस्वीपणे सामना केला नाही, तर या रोगाचे निराकरणे, निदान आणि लस संशोधन या सगळ्यासाठी संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे, या सगळ्याकडे लक्ष वेधत कोरोना व्यवस्थापनातील धड्यांमधून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असे सांगत हर्षवर्धन म्हणाले, “साथीची अचूक माहिती आणि योग्य वर्तन आणि स्वच्छता पद्धतींचा अवलंब करण्यावर आणि याबाबतचे संदेश वेगवान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. क्षयरोगाच्या लक्षणांसंदर्भात अशाच प्रकारे देशव्यापी संदेशामुळे लोकांना वेगाने माहिती मिळू शकते आणि देशातील टीबी संक्रमणासंदर्भात खबरदारीच्या वर्तनाविषयी जागरूकता निर्माण होऊ शकते.”

 

पोलिओविरूद्ध जनजागृती करण्याच्या दृष्टीने त्यांनी दिल्लीचे आरोग्यमंत्री म्हणून उचललेल्या पावलांविषयी त्यांनी माहिती दिली यामध्ये परिसरातील औषध विक्रेता दुकानदार सहभागी झाले होते.

 

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या टीबी नियंत्रण कार्यक्रमात कार्यरत विकास भागीदारांनी गेल्या काही वर्षात त्यांच्या कार्यासंदर्भातील परिणामांची माहिती दिली आणि प्रस्तावित जनआंदोलन चळवळीला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या योजना सामायिक केल्या.

 

राजेश भूषण, केंद्रीय आरोग्य सचिव, आरती आहुजा, अतिरिक्त सचिव (आरोग्य), डॉ. सुनील कुमार, डीजीएचएस आणि मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डॉ. रोडेरिको ओफ्रिन, देशाचे प्रतिनिधी, भारत (डब्ल्यूएचओ) आणि बीएमजीएफ आणि यूएसएआयडी सारख्या विकास भागीदारांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.


Tags: prime minister narendra modiकेंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धनपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

आयटीआय दहावी उत्तीर्णांसाठी भारत डायनॅमिक्समध्ये करिअर संधी

Next Post

सावधान! शेतीमाल भाव पाडण्यासाठी व्यापारी पसरवतात लॉकडाऊनची अफवा!

Next Post
grapes

सावधान! शेतीमाल भाव पाडण्यासाठी व्यापारी पसरवतात लॉकडाऊनची अफवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!