मुक्तपीठ टीम
भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडून ११ वर्षात १४ हजाराहून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. गृहमंत्रालयाच्या सुरक्षा विभागाकडून सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती मागवली होती. सारडा यांनी यावेळी शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटनांसोबतच स्थानिक, भारतीय लष्कर आणि पर्यटकांच्या झालेल्या हानीचाही तपशील मागितला होता. त्यांना याआधी संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीतील आकडेवारी आणि आता गृहमंत्रालयाकडून मिळालेली आकडेवारी यात फरक असल्याचे सांगत, त्यांनी त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
माहितीच्या अधिकारातला तपशील खालीलप्रमाणे :
१४ हजार ४११ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन!
- २००४ पासून १६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एलओसी आणि एलएसीवर पाकिस्तान आणि चिनी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आहे.
- यात सार्वजनिक, खासगी आणि सरकारी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.
- २०१० पासून २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पाकिस्तान आणि चीनकडून १४ हजार ४११ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.
११ वर्षात १२९ हुतात्मा आणि ७०८ स्थानिकांचा मृत्यू
- जम्मू आणि काश्मीरमध्ये २०१० ते २०२१ (फेब्रुवारी पर्यंत) स्थानिकांपेक्षा सुरक्षा दलातल्या जवानांची मोठी जीवितहानी झाली आहे.
- ११ वर्षात १२९ मृत्यू आणि ७०८ स्थानिकांचा मृत्यू झाला आहे.
- तर जम्मू -काश्मीरमध्ये सीमेपलिककडून झालेल्या गोळीबारात सुरक्षादलाच्या १३८ जवानांना वीरमरण आलं आहे तर ६६४ जण जखमी झालेत.
शस्त्र संधी उल्लंघनात झालेल्या हानीची नुकसानभरपाई
- आरटीआयच्या अहवालात नुकसान भरपाईसंदर्भातलीही माहिती देण्यात आली आहे.
- सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्यास संबंधितांच्या कुटुंबियांना किंवा ५०% पेक्षा अधिक अपंगत्व आलेल्या व्यक्तीला ५ लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया रोख मदत दिली जाते.
- घरांचं, पिकांचं, पशुधनाचे नुकसान झाल्यासही नुकसान भरपाई मिळते.
- दुधाळ जनावरांचे नुकसान झाल्यास ५० हजारांची रक्कम दिली जाते.
- तसंच जम्मू आणि काश्मीर सरकार जखमी व्यक्तींना त्यांच्या सध्याच्या नियमांनुसार मदत देते.
- राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) नुसार केंद्र सरकारकडूनही मदत मिळते.
हेही वाचा: सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांना आश्चर्य का वाटले?
याआधी संरक्षण मंत्रालयाकडून माहिती अधिकारातून मिळालेली माहिती:
काँग्रेसपेक्षा भाजपा सत्तेत पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या, युद्धबंदी उल्लंघनात साडेचार हजार पट वाढ!