Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेसपेक्षा भाजपा सत्तेत पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या, युद्धबंदी उल्लंघनात साडेचार हजार पट वाढ!

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांच्या प्रयत्नांमधून आकडेवारी उघड

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narendra bjp

मुक्तपीठ टीम

भारत आणि जग कोरोनाशी लढत असतानाही पाकिस्तानची कुरापतखोरी थांबलेली नाही, तसेच ती भाजपाच्या सत्ताकाळात जास्तच वाढली आहे, असे उघड झाले आहे. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या माहितीतून २०२०या कोरोना संकट वर्षात पाकिस्तानने आजवर केले नव्हते तेवढे म्हणजे ४ हजार ६४५ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. तसेच काँग्रेसच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळापेक्षा भाजपाच्या सात वर्षांच्या सत्ताकाळात पाकिस्तानने युद्धबंदी युद्धबंदी मोडून भारतीय हद्दीत खूप जास्त वेळा आगळीक केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

 

दहा वर्षात ५२३ वेळा, तर सात वर्षात ११ हजार ४२४ वेळा कुरापत

२०२०मध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन सर्वाधिक वेळा झाल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानने सरासरी दिवसाला बारा – तेरा वेळा कुरापत काढली आहे. सन २०२० मध्ये ४ हजार ६४५ वेळा उल्लंघन झाले आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर काँग्रेसच्या मनमोहन सिंह यांच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात ५२३ वेळा तर भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या सात वर्षांच्या सत्ताकाळात ११ हजार ४२४ वेळा पाकिस्तानने युद्धबंदी मोडण्याची आगळीक केल्याचे दिसून येत आहे.

२०२१च्या १५ दिवसात ५२४ वेळा युद्धबंदी उल्लंघन

यावर्षीही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच राहिले आहे. १ जानेवारी २०२१ ते १६ फेब्रुवारी २०२१ या अवघ्या दीड महिन्याच्या दरम्यान सीमेवर ५२४ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन झाले आहे. यावर्षी दिवसाला अकरा वेळा पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे.

 

पाकिस्तानी कुरापतखोरीत तब्बल ४ हजार ६०० पट वाढ – सारडा

Prafull Sarada RTI Puneपुण्यातील कार्यकर्ते प्रफुल सारडा यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता. त्यातून मिळालेली माहिती अनेक गैरसमज दूर करणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रसच्या सत्ताकाळापेक्षा भाजपाच्या सात वर्षांच्या सत्ताकाळात पाकिस्तानची कुरापतखोरीची हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे. सारडा यांनी सांगितले की खरोखरच विश्वास बसत नाही. पण मनमोहन सिंह यांच्या सत्तेचे शेवटचे २००४ हे वर्ष आणि मोदींच्या सत्तेचे २०२० हे सातवे वर्ष अशी तुलना जरी केली तरी पाकिस्तानच्या कुरापतखोरीत तब्बल ४ हजार ६०० पट वाढ झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या सात वर्षांच्या कालावधीत भारत-पाकिस्तान सीमेवर ११ हजार ४२४ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन झाले आहे. या उलट मनमोहन सिंहांच्या नेतृत्वाखालील यूपीए सत्ताकाळात २००४ ते २०१३ दरम्यान फक्त ५२३ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन झाले होते.

 

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंहांच्या सत्तेच्या पहिल्याच २००४ या वर्षात युद्धबंदीचे फक्त एकदाच उल्लंघन झाले होते. त्यानंतरच्या वर्षांमध्ये ते वाढत गेले. २००७मध्ये युद्धबंदी उल्लंघनाचे २१ प्रकार झाले. त्यानंतर २००८ मध्ये ७७, २००९ मध्ये २८, २०१० मध्ये ते ४४ वर पोहचले. २०१३ या यूपीए सत्तेच्या शेवटच्या वर्षात पाकिस्तानने १९९ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले.

 

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४मध्ये भाजपा सत्तेवर आली. त्या पहिल्या वर्षात पाकिस्तानने १५३ वेळा कुरापत काढली. आणि त्यानंतर त्यांची कुरापतखोरी वाढतच गेली.

 

मोदी सत्ताकाळातील पाकिस्तानी कुरापतखोरी

  • २०१४-१५३
  • २०१५-१५२
  • २०१६-२२८
  • २०१७-८६०
  • २०१८-१,६२९
  • २०१९-३,२३३
  • २०२०-४,६४५

Tags: BJPCongressIndiaNarendra modiPakistanकाँग्रेसनरेंद्र मोदीपाकिस्तानप्रफुल्ल सारडाभाजपाभारत
Previous Post

‘मराठा आरक्षणासाठी योग्य पावलं उचला’, ठाकरेंचं मोदींना पत्र

Next Post

#मुक्तपीठ मंगळवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ मंगळवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!