मुक्तपीठ टीम
ट्विटरवर एक जाहिरात वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आक्षेपार्ह भाषा वापरली गेली आहे. शॉट या डिओड्रंटच्या या जाहिरातीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. ही जाहिरात महिलांविरोधातील गुन्ह्यांना प्रोत्साहन देत असल्याचे ट्विट लोकांनी केले. अशा जाहिराती तयार करणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे. त्याचवेळी या जाहिरातीची दखल घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही ती जाहिरात वादग्रस्त मानली आहे. डिओड्रंटच्या जाहिराती तातडीने बंद करण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत.
ट्विटरवर जोरदार टीका
- एका युजरने ट्विट केले की जाहिरातीसाठी काही नियम असावेत. डिओड्रंटची जाहिरात खरोखरच घृणास्पद आहे.
- शॉट या शब्दाचा द्व्यर्थी वापर करत ही जाहिरात तयार करण्यात आली आहे.
- महिला अत्याचाराला प्रोत्साहन देणारी असल्याने अशा जाहिरातीवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जाहिरात कोडनुसार चौकशी सुरू आहे
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जाहिरात कोडनुसार डिओड्रंट जाहिराती बनवणाऱ्या कंपनीची चौकशी सुरू केली आहे.
Ministry of Information & Broadcasting has directed a TV channel to take down a highly objectionable misogynist ad promoting a deo called ‘Shot’. Channel has complied.
I&B Ministry has also directed @Google/@YouTube and @Twitter to immediately block this ad from their platforms.1 pic.twitter.com/NjntfSh4ys— Kanchan Gupta 🇮🇳 (@KanchanGupta) June 4, 2022
दिल्ली महिला आयोगाने कारवाईची मागणी केली
- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून या जाहिरातीबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
- नोटीसमधील जाहिरातींचे विवादास्पद वर्णन करताना, त्या म्हणाल्या की, ते पुरुषत्वाचे सर्वात वाईट चित्रण करतात आणि स्पष्टपणे सामूहिक बलात्कार संस्कृतीला प्रोत्साहन देतात. यासाठी कंपनीच्या मालकांना जबाबदार धरले पाहिजे.
Fuming at cringe worthy ads of the perfume ‘Shot’. They show toxic masculinity in its worst form and clearly promote gang rape culture!The company owners must be held accountable. Have issued notice to Delhi Police and written letter to I&B Minister seeking FIR and strong action. pic.twitter.com/k8n06TB1mQ
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) June 4, 2022
मुक्तपीठ भूमिका
- अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दुसऱ्याचा सन्मानानं जगण्याचा अधिकार हिरावणारं नसावंच.
- भले त्या जाहिरातीत नंतर शॉट हा शब्द त्या तरुणांनी त्या डिओड्रंटसाठी वापरल्याचं स्पष्ट होत असेल, पण सुरुवातीपासून त्याचा अविर्भाव, त्यांचं बोलणं हे ते वेगळ्या विकृत अर्थानंच शॉट या शब्दाचा गैरवापर करत असल्याचं स्पष्ट होतं.
- एखाद्या मॉलमध्ये तसं कुणी बोलणार नाही, तसंच एखाद्याच्या खासगी किंवा हॉटेलच्या रुममध्ये जिथं जोडपं एकांतात आहे, तिथं घुसून कुणी असा शब्द वापरणार नाही.
- त्यामुळे नंतर जरी स्पष्ट होत असलं, तरी आधी विकृत पद्धतीनं कुतुहल चाळवत जाहिरात चालवण्याचाच जाहिरात चालवण्याचा हेतूच जास्त दिसतो. त्यासाठी बलात्काऱ्यांच्या विकृत मानसिकतेला आपण प्रोत्साहन देत असल्याचं भानही त्यांनी ठेवलेलं नाही.
- त्यामुळे मंत्रालयाने केलेल्या कारवाईवरच मर्यादित न राहता अशांवर महिला आयोग किंवा अन्य यंत्रणांकडूनही कारवाई झाली, तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला मानला जाऊ शकत नाही.