मुक्तपीठ टीम
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए) कडून नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच एनपीएसला अधिक आकर्षक करण्यासाठी काही बदल केले आहेत. या बदलांतर्गत एनपीएसमध्ये सहभागी होण्यासाठी कमाल वय ६५ वरून ७० वर्षे करण्यात आले आहे.
नियमांमध्ये बदल
- नवीन नियमांबाबत पीएफआरडीएने एक परिपत्रक जाहीर केले आहे.
- यामध्ये नवीन नियमांबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
- ६५-७० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक किंवा भारतातील विदेशी नागरिक एनपीएसमध्ये सामील होऊ शकतो
- वयाच्या ७५व्या वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतो.
५०% फंड इक्विटीमध्ये गुंतवण्याची सोय
- वयाच्या ६५ वर्षांनंतर या योजनेचा लाभ घेतल्यावर, गुंतवणुकीचा ५०% भाग इक्विटीमध्ये गुंतवता येणार.
- जर एखादी व्यक्ती ६५ वर्षांच्या वयानंतर एनपीएसमध्ये सामील झाली तर ‘ऑटो चॉईस’ च्या डीफॉल्ट मोडमध्ये जास्तीत जास्त इक्विटी एक्सपोजर फक्त १५% असेल.
- ग्राहक पेन्शन फंडात जास्तीत जास्त इक्विटी एक्सपोजर ऑटो मोडमध्ये १५% पर्यंत आणि ५०% अॅक्टिव्ह एक्स्पोजर ऑटो मोडमध्ये निवड करू शकतात.
- आता कोणत्याही एनपीएस ग्राहकाला त्याच्या मालमत्तेचे वाटप विविध मालमत्ता वर्गांमध्ये ऍक्टिव्ह चॉईस द्वारे किंवा ऑटो चॉईसद्वारे वाटप करण्याचे स्वातंत्र्य असेल.
नॅशनल पेन्शन योजना – एनपीएस म्हणजे काय?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी २००४ मध्ये एनपीएस सुरू करण्यात आले.
- २००९ मध्ये ही योजना सर्व श्रेणीतील लोकांसाठी खुली करण्यात आली.
- कोणतीही व्यक्ती वर्किंग कार्यकाळात नियमितपणे पेन्शन खात्यात योगदान देऊ शकते.
- ते जमा झालेल्या निधीचा काही भाग एकाच वेळी काढू शकतात आणि उर्वरित रक्कम निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी वापरू शकतात.
एनपीएस गुंतवणुकीसह रिटर्नही वाढते…
- एनपीएस खाते व्यक्तीच्या गुंतवणुकीसह वाढते आणि त्यावर रिटर्न देते.
- केंद्र सरकार, राज्य सरकार, खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि सामान्य नागरिकही या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
- एनपीएसने गेल्या १ वर्षात १२-१५% पर्यंत रिटर्न दिला.
- एनपीएस ग्राहकांना इक्विटीमधून एका वर्षात सुमारे १२.५-१७% परतावा मिळाला आहे.
- प्रिफरेंशिअल शेअर ने १२-१४% रिटर्न दिला आहे.
- तर एनपीएस ग्राहकांनी सरकारी बाँडमध्ये गुंतवणूकीद्वारे १०-१५% रिटर्न मिळवला आहे.