Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नॅशनल पेन्शनसंबंधित नियमांमध्ये बदल, आता ७०व्या वर्षापर्यंत सहभाग शक्य

पीएफआरडीएने केलेल्या एनपीएसच्या नियम बदलांमुळे ज्येष्ठ नागरिकांना फायदा

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
NPS

मुक्तपीठ टीम

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए) कडून नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच एनपीएसला अधिक आकर्षक करण्यासाठी काही बदल केले आहेत. या बदलांतर्गत एनपीएसमध्ये सहभागी होण्यासाठी कमाल वय ६५ वरून ७० वर्षे करण्यात आले आहे.

 

नियमांमध्ये बदल

  • नवीन नियमांबाबत पीएफआरडीएने एक परिपत्रक जाहीर केले आहे.
  • यामध्ये नवीन नियमांबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
  • ६५-७० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक किंवा भारतातील विदेशी नागरिक एनपीएसमध्ये सामील होऊ शकतो
  • वयाच्या ७५व्या वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतो.

५०% फंड इक्विटीमध्ये गुंतवण्याची सोय

  • वयाच्या ६५ वर्षांनंतर या योजनेचा लाभ घेतल्यावर, गुंतवणुकीचा ५०% भाग इक्विटीमध्ये गुंतवता येणार.
  • जर एखादी व्यक्ती ६५ वर्षांच्या वयानंतर एनपीएसमध्ये सामील झाली तर ‘ऑटो चॉईस’ च्या डीफॉल्ट मोडमध्ये जास्तीत जास्त इक्विटी एक्सपोजर फक्त १५% असेल.
  • ग्राहक पेन्शन फंडात जास्तीत जास्त इक्विटी एक्सपोजर ऑटो मोडमध्ये १५% पर्यंत आणि ५०% अॅक्टिव्ह एक्स्पोजर ऑटो मोडमध्ये निवड करू शकतात.
  • आता कोणत्याही एनपीएस ग्राहकाला त्याच्या मालमत्तेचे वाटप विविध मालमत्ता वर्गांमध्ये ऍक्टिव्ह चॉईस द्वारे किंवा ऑटो चॉईसद्वारे वाटप करण्याचे स्वातंत्र्य असेल.

नॅशनल पेन्शन योजना – एनपीएस म्हणजे काय?

  • सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी २००४ मध्ये एनपीएस सुरू करण्यात आले.
  • २००९ मध्ये ही योजना सर्व श्रेणीतील लोकांसाठी खुली करण्यात आली.
  • कोणतीही व्यक्ती वर्किंग कार्यकाळात नियमितपणे पेन्शन खात्यात योगदान देऊ शकते.
  • ते जमा झालेल्या निधीचा काही भाग एकाच वेळी काढू शकतात आणि उर्वरित रक्कम निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी वापरू शकतात.

 

एनपीएस गुंतवणुकीसह रिटर्नही वाढते…

  • एनपीएस खाते व्यक्तीच्या गुंतवणुकीसह वाढते आणि त्यावर रिटर्न देते.
  • केंद्र सरकार, राज्य सरकार, खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि सामान्य नागरिकही या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
  • एनपीएसने गेल्या १ वर्षात १२-१५% पर्यंत रिटर्न दिला.
  • एनपीएस ग्राहकांना इक्विटीमधून एका वर्षात सुमारे १२.५-१७% परतावा मिळाला आहे.
  • प्रिफरेंशिअल शेअर ने १२-१४% रिटर्न दिला आहे.
  • तर एनपीएस ग्राहकांनी सरकारी बाँडमध्ये गुंतवणूकीद्वारे १०-१५% रिटर्न मिळवला आहे.

Tags: NPSएनपीएसपीएफआरडीएपेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी
Previous Post

“जगाला अण्वस्त्र मुक्त करणे काळाची गरज” : महेंद्र सांघी

Next Post

अनिल परबांनंतर आता भावना गवळींमागे ‘ईडी’पिडा!

Next Post
bhavana gawali

अनिल परबांनंतर आता भावना गवळींमागे ‘ईडी’पिडा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!