मुक्तपीठ टीम
कोरोना काळात मास्क वापरणे अनिवार्य आहे. अशा परिस्थित मास्क ही कोरोनाला रोखणारी ढाल आहे. काही लोक लस तयार झाल्यापासून मास्कचा वापर गंभीरपणे घेत नाहीत. वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता मास्क घालण्याचा सल्ला सर्व जण देत आहेत. तसेच, दम्याचे रुग्ण आणि जे चष्मा घालतात त्यांना सतत मास्कचा वापर हा त्रासदायक ठरतो. या समस्या लक्षात घेऊन वैज्ञानिकांनी पॉलिमरपासून बनविलेला पारदर्शक मास्क तयार केला आहे.
लोक का मास्कचा वापर करत नाही?
१. काही लोकांना मास्क घातल्यामुळे श्वसनाचा त्रास होतो
२. बहुतेक दम्याचे रुग्ण याचा वापर करणे टाळतात
३. जे चष्मा घालतात, जर त्यांनी नाकापर्यंत मास्क घातला असेल तर चष्म्याच्या काचेवर बाष्प जमा होते.
४. काही लोक त्यांचे सौंदर्य लपवू इच्छित नाहीत
५. सतत मास्कचा वापर केल्याने शरीरात ऑक्सिजनचे पर्याप्त प्रमाणात बाहेर पडत नाही, ज्यामुळे डोकेदुखी इत्यादींच्या काही समस्या उद्भवतात.
चंदीगडच्या केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संस्थेच्या वैज्ञानिकांनी हा पारदर्शक मास्क तयार केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही त्यांचे केवळ कौतुकच केले नाही तर तो परिधानही केले. हा मास्क सहज धुतला जाऊ शकतो. सीएसआयओ वैज्ञानिक डॉ. सुनीता मेहरा यांच्या म्हणण्यानुसार, हा मास्क पॉलिमरचा बनलेला आहे. कोरोना शरीरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी तो प्रभावी आहे. कारण हा मास्क सर्व बाजूंनी बंद आहे. श्वास बाहेर सोडल्यानंतर बाष्प जमा होत नाही. यामुळे सौंदर्य देखील लपवले जाणार नाही, कारण ते पारदर्शक आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही हे विशेष आहे. कारण विमानतळ आणि इतर ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये सहज चेहरा दिसू शकेल.
हा मास्क फक्त १५० ते २०० रुपयांमध्ये खरेदी करता येतो. तसेच, काही दिवसांत बाजारात आल्यानंतर, त्याची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते. एक चष्मा देखील तयार केला जात आहे. तो वापरल्यानंतर डोळे कोरोनापासून सुरक्षित राहतील. याची किंमत जवळजवळ अडीचशे रुपये असेल.