मुक्तपीठ टीम
आधार नियामक युनिक आयडेंटिटी ऑथेरिटी ऑफ इंडिया (UIDAI)सध्या एका मोठ्या संकल्पनेवर काम करत आहे. जर ती संकल्पना प्रत्यक्षात आली तर युजर्सचा स्मार्टफोन हाच युनिव्हर्सल ऑथेंटिकेटर म्हणून वापरता येईल. सध्या, फिंगरप्रिंट्स, आयरिश स्कॅन आणि वन-टाइम पासवर्ड (OTP) प्रमाणीकरणासाठी वापरले जातात. पण लवकरच स्मार्टफोनवरून ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
काम लवकरच पूर्ण होईल
- UIDAI ने वेगाने काम सुरू आहे.
- अशा परिस्थितीत, आशा आहे की लवकरच हा स्मार्टफोन सार्वत्रिक ऑथेंटिकेटर म्हणून विकसित केला जाईल. यानंतर शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी लोकांना कार्यालये किंवा अन्य कोणत्याही शासकीय संस्थेच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
- आधार कार्ड धारक व्यक्ती घरबसल्या स्मार्टफोनवरून आधार कार्डची पडताळणी करू शकेल.
स्मार्टफोनचा वापर कुठे कुठे?
- बँक खाते उघडणे
- शिधापत्रिका बनवताना आणि रेशन घेताना
- नवीन मोबाईल कनेक्शन
- पेन्शन करण्यासाठी
- डीएल करण्यासाठी
- पॅन लिंकिंग मध्ये
८० कोटी स्मार्टफोनसाठी ऑथेंटिकेटर बनवले जाईल
- सध्या एकूण १२० कोटी मोबाईल कनेक्शन आहेत.
- यापैकी ८० कोटी स्मार्टफोन ऑथेंटिकेटरसाठी वापरले जाऊ शकतात.
- तसेच, ऑथेंटिकेटरसाठी स्मार्टफोन कसा वापरला जाऊ शकतो याबद्दल कोणतीही अतिरिक्त माहिती या प्रकरणात सामायिक केलेली नाही.
आधार सुरक्षितता ठरली अडथळा
- स्मार्टफोनला आधार ऑथेंटिकेटर बनवण्याच्या दिशेने सुरक्षा हा मोठा अडथळा ठरू शकतो.
- आधार डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर (DBT) योजनांशी जोडलेला आहे.
- यामुळे सुमारे २ लाख कोटी रुपयांची फसवणूक रोखण्यात मदत झाली आहे.
- बँकिंग आणि दूरसंचार उद्योगाद्वारे केवायसी अपडेटसाठी आधार क्रमांकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
- देशातील सुमारे ७० कोटी लोकसंख्या आणि निम्म्याहून अधिक बँक खाती आधारशी जोडलेली आहेत.
- तर ३ कोटी पेन्शन खात्यांसाठी १० कोटींची रक्कम आधार पडताळणीनंतरच दिली जाते.