मुक्तपीठ टीम
नासाने चंद्रावर भविष्यातील इतर मोहिमांसाठी चंद्रावर मानवांची दीर्घकालीन उपस्थिती सुनिश्चित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल यशस्वीरित्या उचलले आहे. या दशकाच्या अखेरीस म्हणजेच २०३० पर्यंत मानव चंद्रावर स्थायिक होऊ शकतो. नासाच्या ओरियन स्पेसक्राफ्ट मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या हॉवर्ड हू यांनी हा दावा केला आहे. या कामात मदत करण्यासाठी रोअर्स असतील.
हॉवर्ड हू नेमकं काय म्हणाले?
- या दशकात आपण चंद्रावर काही काळ राहू शकतो, कारण तेथे मानवांना राहण्यासाठी जागा उपलब्ध होईल.
- आपण मानवांना चंद्राच्या भूमीवर पाठवू. तो तेथे राहून वैज्ञानिक कार्य करेल.
- ते लवकरच तेथील वातावरणाशी जुळवून घेतील.
- नासाच्या चंद्र मोहिमेचा भाग म्हणून आर्टेमिस रॉकेटद्वारे ओरियन अंतराळयानाचे प्रस्थान मानवी अंतराळ उड्डाणासाठी ऐतिहासिक आहे.
- हे अभियान यशस्वी झाल्यास आर्टेमिस २ आणि ३च्या उड्डाणांचा मार्ग मोकळा होईल. यामध्ये अंतराळवीरांना चंद्रावर पाठवले जाईल.
४२ दिवस चंद्रावर चाचणी केल्यानंतर पृथ्वीवर परतणार!
- नासाने आर्टेमिस-1 मोहीम सुरू केली आहे.
- चालक नसलेल्या ओरियन अंतराळयानाचे हे पहिले चाचणी उड्डाण आहे.
- ओरियन सुमारे ४२ दिवस चंद्राची चाचणी करेल.
- ११ डिसेंबर रोजी ते पृथ्वीवर परत येईल.
- जवळपास ५० वर्षांनंतर नासाने चंद्र मोहीम सुरू केली आहे.
- विशेष म्हणजे १९७२ मध्ये अपोलो-१७ मोहिमेनंतर मानव चंद्रावर पोहोचलेला नाही.
नासा चंद्राच्या पृष्ठभागापासून ६० मैलांवर असलेल्या ओरियन उपग्रहाद्वारे विविध चाचण्या घेणार आहे. आर्टेमिस मिशनद्वारे, नासाने अंतराळवीरांना चंद्रावर राहण्यासाठी एक अंतराळ स्थानक तयार करण्याची योजना आखली आहे.